आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • If I Start Your Opening Then There Will Be No Way To Escape From Delhi Says Deep Siddhu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोपी दीप सिद्धूची शेतकरी नेत्यांना धमकी:'मी जर तुमच्या गोष्टी उघड करण्यास सुरुवात केली तर दिल्लीतून पळण्यासाठी मार्ग मिळणार नाही'

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर व्हिडिओ करुन म्हणाला - 'मी कुठेही पळालो नाही, सिंघु बॉर्डरवरच आहे'

लाल किल्ल्यावर खालसा पंथाचा झेंडा फडकावण्यासाठी लोकांना भडकावण्याचा आरोप दीप सिद्धूवर आहे. आता पंजाबी सिंगर दीप सिद्धूने स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले आहे. त्याने बुधवारी रात्री आपल्या सोशल मीडियावर लाइव्ह येऊन शेतकरी नेत्यांना धमकी दिली. तो म्हणाला की, 'तुम्ही मला गद्दारचे सर्टिफिकेट दिले आहे, जर मी तुमच्या गोष्टी उघड करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला दिल्लीतून पळण्यासाठीही मार्ग मिळणार नाही.'

सिद्धू म्हणाला की, 'मला लाईव्ह यावे लागले कारण माझ्या विरोधात द्वेष पसरवला जात आहे. खूप काही खोटे वृत्त पसरवले जात आहे. मी एवढे दिवस हे सर्व ऐकून घेत होतो, कारण मला वाटत होते की, आपल्या संघर्षाला काही नुकसान पोहोचू नये. पण तुम्ही अशा स्तरावर पोहोचले आहेत की, मला काही गोष्टी बोलणे खूप गरजेचे झाले आहे.'

'पहिली गोष्ट म्हणजे 25 तारखेच्या रात्री, व्यासपीठावर तरुणांनी आपला संताप व्यक्त केला होता, कारण त्यांना पंजाबहून दिल्ली येथे परेडसाठी बोलावण्यात आले होते. त्यासाठी व्यासपीठावरून वारंवार मोठ्या घोषणा व आश्वासने देण्यात आल्या. संतापलेल्या या तरुणांनी सांगितले की, जेव्हा आम्ही दिल्लीला आलो आहोत, तेव्हा तुम्ही आम्हाला सरकारने ठरवलेल्या मार्गावर जाण्यास सांगत आहात, जे आम्हाला मान्य नाही.'

मी जमावाला समजावले की, 'माझ्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ पाहू नका' : सिद्धू
सिद्धू याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की 'त्या वेळी मंचावरील परिस्थिती अशी झाली होती की नेतृत्त्व करणारे शेतकरी नेते तेथून निघून गेले. त्यानंतर निहंगच्या कैद्यांनी मला परिस्थिती खराब असल्याचे सांगून तेथे बोलावले. मी तिथे मंचावर जाऊन शेतकरी नेत्यांचे समर्थन केले आणि जमावाला सांगितले की, शेतकरी नेते वृद्ध आहेत. ते खूप अस्वस्थ आहेत, म्हणून आपल्याला समजून घेतले पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो आहे की त्या रात्रीचे माझे भाषण पाहू नये.''

मी त्याच दिवशी असे बोललो. मी शेतकरी नेत्यांना देखील सांगितले होते की लोक जे म्हणतात त्यानुसार सामूहिक निर्णय घ्या, हे चुकीचे होणार नाही, कारण सोबतीनेच आपला मोर्चा चालू आहे आणि आम्ही इथे उभे आहोत. हे शेतकरी नेत्यांना समजले नाही. शेतकरी आणि पोलिसांनी जो मार्ग ठरवला होता त्या मार्गावर शेतकर्यांनी दुसऱ्या दिवशी मार्च काढला. ज्यावर 3000 लोकही नव्हते. सिंघु-टीकरी आणि गाजीपूर बॉर्डरवरुन लोक स्वतःच चुकीच्या रुटवर निघाले आणि लाल किल्ल्याकडे निघाले. त्यांचे कुणीही नेतृत्त्व करत नव्हते.'

'मी पोहोचण्यापूर्वीच लाल किल्ल्याचे गेट तुटले'
दीप सिद्धूने म्हटले की, 'मी लाल किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा तेथील गेट तुटलेले होते. तेथे हजारोंचा जमाव उभा होता. मी नंतर तिथे पोहोचलो. ज्या रोडवरुन पोहोचलो तेथे शेकडो ट्रॅक्टर पहिलेच उभे होते. मी पायीच किल्ल्याच्या आत पोहोचलो. तिथे कोणतेही शेतकरी नेते नव्हते. जे आधी मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते, त्यातीत एकही नेता तेथे नव्हता. सोशल मीडियावर लाइव्ह येऊन मोठ्या मोठ्या घोषणा करत होते की, दिल्लीच्या मानेवर पाय ठेवू मात्र तिथे कुणीही नव्हते.'

'दरम्यान, काही तरुणांनी मला पकडून नेले. तेथे दोन झेंडे होते, एक शेतकरी ध्वज आणि दुसरा निशान साहिब. सरकारला आपला राग दाखवण्यासाठी आम्ही तेथे दोन्ही झेंडे लावले. आम्ही तिरंगा काढला नाही. आम्हाला कोणतीही भीती नाही कारण आम्ही काहीही चूक केली नाही.'

गेल्या 6 महिन्यांत सरकारने वारंवार अपमान केला आहे
आम्ही कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले नाही असे पंजाबी गायकाने स्पष्ट केले. 'आम्ही कोणतीही हिंसाचार केला नाही. आमच्या लोकांवर कोणीही लाठीचार्ज केला नाही. सर्व काही सुरळीत पार पडले. आमचे अधिकार देण्यात यावेत, हे आम्ही सरकारला दाखवायचे होते. आमच्या मागण्यांचा विचार करा, कारण गेल्या सहा महिन्यांपासून आम्हाला सरकारकडून चांगली वागणूक मिळाली नव्हती. त्यांनी आमचा वारंवार अपमान केला होता.'

सिद्धू यांनी जमावाला भडकवल्याचा आरोप
शेतकरी संघटनांनी दिल्लीमध्ये शेतकरी ट्रॅक्टर मार्च दरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेचा आरोप दीप सिद्धूवर लावला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते गुरनामसिंग चंढूनी म्हणाले की, लाल किल्ल्याला भेट देण्याचा शेतकरी संघटनांचा कोणताही कार्यक्रम नव्हता. दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकवले आणि त्यांना बाहेरील रिंग रोडवरून लाल किल्ल्यापर्यंत नेले. या प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या FIR मध्ये सिद्धू याचे नावही आहे.