आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या 2 कोटी सह्यांचे निवेदन त्यांनी राष्ट्रपतींना देऊन कृषी कायदामागे घेण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.
राहुल म्हणाले- पंतप्रधानांना फक्त 2-3 लोकांचा फायदा हवा आहे
राहुल गांधी आणि गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन कृषी कायदामागे घेण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. राष्ट्रपती भवनातून निघाल्यानंतर राहुल म्हणाले की, शेतकरी आणि छोटे व्यापारी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. जर कृषी व्यवस्थेला छेडले तर संपूर्ण देशावर याचा परिणाम होईल. यामुळे असे कायदे रद्द करायला हवेत. पंतप्रधानांना फक्त 2-3 लोकांचे भले व्हावे असे वाटत आहे.
'मोहन भागवत मोदींविरूद्ध बोलले तर त्यांनाही अतिरेकी ठरवले जाईल'
प्रियंकांच्या अटकेबाबत विचारले असता राहुल म्हणाले की, आज देशात लोकशाही शिल्लक नाही. मारहाण करणे आणि ताब्यात घेणे या सरकारचे काम झाले आहे. सरकारच्या या धोरणांमुळे कोणत्याही तरुणांना देशात नोकरी मिळणार नाही. छोटे व्यवसाय संपतील. मोदी क्रोनी भांडवलदारांसाठी पैसे कमवत आहेत. जो कोणी त्यांच्या विरोधात उभे राहण्याचा प्रयत्न करेल त्याला दहशतवादी म्हटले जाईल. मग तो शेतकरी असो, मजूर असो किंवा मोहन भागवत असो. असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवी टीका केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.