आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If No One Has A Majority In Punjab, The Possibility Of A Shiad BJP Alliance; Election Ends With 68% Turnout | Marathi News

निवडणूक:पंजाबमध्ये कुणालाच बहुमत नसेल तर शिअद-भाजप युतीची शक्यता; 68% मतदानासह निवडणूक समाप्त, 2017 पेक्षा 9% कमी मतदान

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पायापासून पोटापर्यंत एक शरीर, मते २... सोहनाने कुणाला मत दिले, मोहनाला माहीत नाही - Divya Marathi
पायापासून पोटापर्यंत एक शरीर, मते २... सोहनाने कुणाला मत दिले, मोहनाला माहीत नाही

प्रत्येक लढत २ किंवा ३ पक्षांत होत राहिली, ५ प्रमुख पक्षांत मतविभागणी
पंजाबमध्ये काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप), शिअद+बसपा, भाजप+कॅप्टन आणि किसान मोर्चात लढत होत आहे. त्यामुळे पक्षांच्या विजय-पराभवातील फरक अत्यंत कमी राहणार आहे.

कोणाची काय समीकरणे?
काँग्रेसचे दलित कार्ड : ३२% दलित लोकसंख्येच्या पंजाबात पहिल्यांदा एखादा पक्ष दलित सीएम चेहरा घेऊन मैदानात आहे. २०१७ मध्ये काँग्रेसचा मतांचा वाटा ३८.५% होता. पण कॅप्टन वेगळे झाल्याचे परिणाम दिसत आहेत.

आप : गेल्या वेळेसच्या चुकीची पुनरावृत्ती नाही : सीएम चेहऱ्यासह मैदानात आहे. २०१७ मध्ये २३.७% मते मिळाली होती. आपचे लक्ष ६९ जागांच्या मालवावर आहे. त्यामुळे मालवात काँग्रेसचे सीएम चन्नी निवडणूक लढत आहेत.

शिअद सध्या एकटाच, निकालानंतर खेळ शक्य.. शिअद मागील वेळी भाजपसोबत होता. शिअदला २५.२%, भाजपला ५.४% मते मिळाली होती. जर काँग्रेस किंवा आपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर शिअद+भाजप+कॅप्टन युती करू शकतात.

किसान समाज मोर्चा गावांत परिणाम दसतोय : किसान आंदोलनामुळे संघटनात्मकरीत्या मजबूत झालेल्या शेतकरी संघटना ग्रामीण भागात सर्वच पक्षांची समीकरणे बिघडवत आहे.

डेऱ्याचे फेरे याचे २ प्रमुख घटक, जे शेवटच्या क्षणी गणित बिघडवू किंवा बनवू शकतात.
पहिला- डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांनी अनुयायांना भाजप आणि शिअदला मतदान करण्याचा संदेश दिला. पंजाबच्या निम्म्या जागांवर डेरा समर्थकांचा चांगलाच प्रभाव आहे. दुसरा- राधा स्वामी डेराच्या मुखींसोबत पंतप्रधान मोदी आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची चित्रे समोर आली आहेत. याकडेही राजकीय नजरेतून बघितले जात आहे.

पायापासून पोटापर्यंत एक शरीर, मते २... सोहनाने कुणाला मत दिले, मोहनाला माहीत नाही
पंजाबच्या सोहना आणि मोहनाने पहिल्यांदा मतदान केले. पायापासून ते पोटापर्यंत त्यांचे शरीर एक आहे. त्यावर दोन शरीरे आहेत. सोहना-मोहना मतदान केंद्रावर गेल्यावर अधिकाऱ्यांनी आधी मोहनाला स्लीपिंग गॉगल घातला. म्हणजे तो सोहनाला मत देताना बघणार नाही. नंतर मोहनाने मत दिले.

बातम्या आणखी आहेत...