आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If Not Approved, We Will Not Accept European Vaccine Certificate Either, A Warning Was Given By India A Day Ago

कोव्हिशील्डला युरोपातील 8 देशांत ग्रीन पास:अप्रूव्ह केले नाही तर आम्हीही युरोपचे लस प्रमाणपत्र स्विकारणार नाही, एका दिवसांपूर्वी भारताने दिला होता इशारा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित केला होता

भारत आणि युरोपियन युनियन (EU) मध्ये गेल्या काही दिवसांपासून लसींच्या ग्रीन पासवरुन चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर युरोपातील आठ देशांनी कोव्हिशील्ड लसीला ग्रीन पास देत आपल्या देशातील आपत्कालीन वापराच्या लसींमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे आता या देशांमधील ज्या लोकांनी कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहे त्यांना कोरोना नियमांतून सूट दिली जाणार आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, मान्यता देणार्‍या देशांमध्ये जर्मनी, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड, स्पेन आणि स्वित्झर्लंडचा आदी देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने एका दिवसांपूर्वी युरोपाला ग्रीन पासवरुन इशारा दिला होता.

भारताने म्हटले होते की, जर या लसीला युरोपात ग्रीन पास मिळाली नाही तर आम्हीही या देशातील लस प्रमाणपत्राला ग्राह्य धरणार नसल्याचे म्हटले होते. त्यासोबतच या देशांतून जे कोणी येतील त्यांना क्वारंनटाईन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

ग्रीन पास योजना आजपासून लागू होणार
युरोपियन युनियनचे डिजिटल कोविड प्रमाणपत्र योजना 'ग्रीन पास' 1 जुलैपासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना महामारीदरम्यान नोंदणीकृत लस घेतलेल्या लोकांना ग्रीन पास असलेल्या देशांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात लसीकरण केलेल्या लोकांच्या कोविड प्रमाणपत्राला कोविन पोर्टलवर व्हेरिफाय करता येईल असे भारताने युरोपियन वैद्यकीय एजन्सीला सांगितले आहे.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित केला होता
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी ईयूचे प्रतिनिधी जोसेफ बोररेल फोंटेलेस यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान, त्यांनी कोव्हिशील्ड लसीला संबंधित देशात ग्रीन पास मिळावी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता.

बातम्या आणखी आहेत...