आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If Sidhu Is Given Importance, It Will Hit The Party In Punjab, CM Amarinder Singh

चंदीगड:सिद्धू यांना महत्त्व दिल्यास पंजाबमध्ये पक्षाला फटका, सीएम अमरिंदरसिंगांचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना इशारा

चंदीगड/जालंधर/नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी दिल्ली दरबारात पुन्हा शक्तिप्रदर्शन केले. सिद्धू यांनी पंजाब प्रभारी हरीश रावत आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी दीड तास चर्चा केली. यामुळे ते पंजाबचे प्रदेशाध्यक्ष होत असल्याच्या बातम्या आल्या. त्यांच्या समर्थकांनी जल्लोषही केला.

दुसरीकडे, सिद्धू यांच्या भेटीआधी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवले. अमरिंदरसिंग यांनी पत्रात पक्षश्रेष्ठींना अनेक पर्याय सुचवले. प्रत्येक पर्यायाचे गंभीर परिणामही सांगितले. त्यांनी म्हटले आहे की, सिद्धूंना जास्त महत्त्व दिल्याने हिंदू आणि दलित नेत्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. यामुळे पंजाबमध्ये पक्षाचे नुकसान होऊ शकते. मात्र, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मान्य असेल, असे शेवटी त्यांनी लिहिले आहे. नंतर हरीश रावत यांनी सांगितले, सर्वांचे समाधान करणे शक्य नाही. मात्र, राजकारणात निर्णय घ्यावे लागतात. रावत शनिवारी चंदीगडमध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.