आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:प्राेटाेकाॅलचे पालन केले नाही तर पुन्हा स्थिती बिघडणार, 73 जिल्ह्यांत 10 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

निर्बंध शिथिल केल्यानंतर बाजारपेठा आणि पर्यटन क्षेत्रांतील गर्दीची दृश्ये भयावह असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी त्याचे फोटो दाखवत सांगितले की, हिल स्टेशनमध्ये येत असलेले लोक कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसते. यामुळे महामारी आटोक्यात आलेले यश आपण पुन्हा गमावून बसू.

अग्रवाल म्हणाले, आजही काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. ५ जुलैला संपलेल्या आठवड्यातही १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ७३ जिल्ह्यांत संसर्गाचा दर १० टक्क्यांवर होता. यामुळे आता लॉकडाऊन उठवल्यावर लोकांचा निष्काळजीपणा कोरोना संसर्गाच्या दृष्टीने पुन्हा धोकादायक ठरू शकतो. संयुक्त पत्रकार परिषदेत आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, ‘देशभर बाजारपेठांमध्ये दिसत असलेल्या गर्दीची छायाचित्रे भयावह आहेत. लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. भविष्यातील खरे आव्हान कोरोनाची तिसरी लाट नव्हे, तर आपण त्याबाबत किती जागरुक आहोत आणि कसे वागतो हे आहे.’

बातम्या आणखी आहेत...