आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये सरकार आल्यास 500 रुपयांत सिलिंडर:काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ग्वाही; म्हणाले - 300 युनिट वीजही मोफत देणार

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी आठ आश्वासने दिली आहेत. त्याअंतर्गत सरकार स्थापन झाल्यास ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, ३०० युनिट वीज, १० लाखांपर्यंत उपचारांचा खर्च देण्याची घोषणा केली. तसेत शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे, ३००० सरकारी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडणे आणि कोरोनात प्राण गमावलेल्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाखांची भरपाई देण्याचेही आश्वासन दिले. राज्यातील १० लाख युवकांना ५ वर्षांत रोजगार देण्याचीही घोषणा केली. दरम्यान, २०२४ मध्ये गैर-भाजप सरकार केंद्रात सत्तेत आले तर देशातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येईल, असे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...