आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If The Number Of Daily Active Patients Reaches 1 Crore, 3.45 Lakh Oxygen Beds Will Be Required

युद्ध कोरोनाविरुद्ध:रोजचे सक्रिय रुग्ण 1 कोटी झाल्यास लागतील 3.45 लाख ऑक्सिजन बेड, तिसऱ्या लाटेसाठी 2500 कोटींची औषधी घेणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: पवन कुमार
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट कायम असतानाच केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या एम्पाॅवर्ड गट- १ आणि २ ने तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या तयारीचा रोडमॅप तयार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एम्पाॅवर्ड गटांचा अंदाज आहे की, दुसऱ्या लाटेतील पीकच्या वेळी एका दिवसात ४.१४ लाख नवे रुग्ण आढळले होते, तर तिसऱ्या लाटेतील पीकदरम्यान ६.२१ लाख रुग्ण सापडू शकतात. एका दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या १ कोटीवर गेल्यास काय करावे लागेल, याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अंदाजानुसार तेव्हा ६९ हजार जणांना आयसीयू बेड्स आणि ३.४५ लाख जणांना ऑक्सिजन बेडची गरज भासेल. उपलब्ध साधनांच्या शासकीय आकडेवारीवरून दिसते की, स्थिती बिघडल्यास सुमारे ९० हजार ऑक्सिजन बेड कमी पडतील. विशेष म्हणजे याचा सामना करण्याचीही तयारी आहे. गुरुवारी मंत्रिमंडळाने २३१३० कोटींच्या आपत्कालीन निधीला मंजुरी दिली आहे, त्यात होणाऱ्या कामांमध्ये २० हजार आयसीयू बेड वाढवण्याचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच १५०० ऑक्सिजन प्रकल्पांद्वारे ४ लाख ऑक्सिजन बेड वाढवले जातील. मात्र बेडच्या उपलब्धतेची हीच आकडेवारी दुसऱ्या लाटेतही देण्यात आली होती. तरीही ऑक्सिजन बेडची टंचाई झाली होती.

अंदाज : सक्रिय रुग्णांतील २३% ना भासेल रुग्णालयाची गरज... दुसऱ्या लाटेत १५-२०% होती
तिसऱ्या लाटेत वेगाने रुग्ण वाढले तर सक्रिय रुग्णांतील २३%ना रुग्णालयात जाण्याची गरज भासू शकते. दुसऱ्या लाटेत १५-२०% रुग्णांना रुग्णालयात जावे लागले होते. एक कोटी सक्रिय रुग्ण झाले तर २३ लाखांना रुग्णालयाची गरज भासेल.

- ३% म्हणजे ६९ हजारांना आयसीयू बेडची गरज भासेल. सध्या ७५८६७ आयसीयू बेड आहेत. - १५% म्हणजे ३.४५ लाखांना ऑक्सिजन बेडची गरज असेल. आकड्यात देशात सध्या २.५५ लाख ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. - ५% म्हणजे १.१५ लाखांना आयसोलेशन बेडची गरज असेल. देशात सध्या ४.९५ लाख आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत.

दावा : 2.55 लाख खाटा आहेत, 90 हजारच कमी... वाढवताहेत 4 लाख
...अन‌् वास्तव : दुसऱ्या लाटेत एका दिवसात सर्वाधिक ३७.४ लाख सक्रिय रुग्ण १० मे रोजी होते. आकडेवारीनुसार तेव्हाही २.५५ लाख ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. २०% म्हणजे ७.४९ लाख रुग्णांना रुग्णालयाची तर त्याच्या १५% म्हणजे १.१२ लाखांना ऑक्सिजन बेडची गरज होती. तरीही हाहाकार माजला.

बातम्या आणखी आहेत...