आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा शेवट?:वैज्ञानिकांचा दावा खरा ठरला तर कोरोना आता संपण्याच्या मार्गावर; 50% वा त्यापेक्षा कमी लोकसंख्येस संसर्ग होऊनही येऊ शकते हर्ड इम्युनिटी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई-अहमदाबादमध्ये सिरो सर्व्हेत अर्धी लोकसंख्या संक्रमित आढळली होती, आता नवे रुग्ण घटले

काेराेनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीसोबतच हर्ड इम्युनिटीही उपयुक्त ठरते, असे वैज्ञानिक सांगत आहेत. हर्ड इम्युनिटी म्हणजे विषाणूला अशी माणसे मिळणे बंद होणे, जे संसर्ग करून तो सतत पसरत राहील. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार, ७०% लोकांत विषाणूरोधक क्षमता निर्माण झाल्यावरच एखाद्या क्षेत्रात हर्ड इम्युनिटी विकसित होईल. ही क्षमता लसीकरण किंवा संसर्ग बरा झाल्यानंतर येऊ शकते. एखादी संक्रमित व्यक्ती आणखी किती लोकांपर्यंत विषाणूचा संसर्ग पसरवत आहे या आधारावर हर्ड इम्युनिटी पाहिली जाते. अर्थात, काही संशोधक नवी आशा जागवणाऱ्या शक्यता शोधत आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत १२ पेक्षा जास्त वैज्ञानिकांनी म्हटले की, हर्ड इम्युनिटीची सीमा ५०% किंवा त्यापेक्षा कमी होऊ शकते. वैज्ञानिक आणि गणितज्ञ जटिल सांख्यिकी माॅडेलिंगच्या आधारावर हा अंदाज लावत आहेत. त्यांच्यानुसार, न्यूयॉर्क, लंडन आणि मुंबईच्या काही भागांत विषाणूविरोधात भक्कम इम्युनिटी निर्माण झाली आहे. हार्वर्ड टीएच चान स्कूल अाॅफ पब्लिक हेल्थमधील महामारीतज्ञ बिल हनैग म्हणाले- न्यूयाॅर्क आणि लंडनच्या काही पॉकेट्समध्ये भक्कम इम्युनिटी आहे. स्टॉकहोम विद्यापीठातील गणितज्ञ टॉम ब्रिटन म्हणतात की, ४३ % लोकांना संसर्ग झाल्यावर हर्ड इम्युनिटी येऊ शकते. म्हणजे एखाद्या लोकसंख्येत एवढ्या लोकांना संसर्ग झाल्यावर किंवा ते बरे झाल्यावर विषाणू अनियंत्रित पद्धतीने पसरणार नाही. अर्थात, हर्ड इम्युनिटीची ही एक मोठी किंमत आहे. ४३% लोक संक्रमित होणे म्हणजे बरेच लोक आजारी पडतील. मृत्यूही होतील.

न्यूयाॅर्कच्या काही क्लिनिकमध्ये आलेल्या ८०% लोकांत अँटिबॉडी आढळल्या. पण कोलंबिया विद्यापीठाचे महामारीतज्ञ वान यांग यांच्या मते क्लिनिकमध्ये येणारे सिम्प्टोमॅटिक असतात. ते संक्रमित मिळण्याची शक्यता जास्त आहे.

या उदाहरणांवरून समजून घेऊ... मुंबई-अहमदाबादमध्ये सिरो सर्व्हेत अर्धी लोकसंख्या संक्रमित आढळली होती, आता नवे रुग्ण घटले

स्वस्थ लोकसंख्येच्या सिरो सर्व्हेत अँटिबॉडी टेस्टद्वारे हे पाहिले जाते की, शरीरात अँटिबॉडी विकसित झाली की नाही. ती विकसित होण्याचा अर्थ व्यक्ती कोरोनाद्वारे संक्रमित होऊन बरीही झाली आहे.

> दिल्ली, मुंबईत एकाच वेळ सिरो सर्व्हे झाले. फरक असा होता की, दिल्लीच्या सर्व जिल्ह्यांत, तर मुंबईच्या ३ वॉर्डात हा सर्व्हे झाला. दिल्लीच्या सर्व्हेचा निकाल असे सांगतो की, २३% लोकसंख्या संक्रमित होऊन बरी झाली होती. दिल्ली, मुंबईत आता नवे रुग्ण कमी आहेत.

> मुंबईच्या झोपड्यांत ५७%आणि पॉश भागांत १६% लोकांत अँटिबॉडी मिळाल्या. असे मानले जाते की, मुंबईची ३३% लोकसंख्या संक्रमित होऊन बरी झाली आहे. धारावीमध्ये नवे रुग्ण घटण्यामागेही हर्ड इम्युनिटी असू शकते.

> अहमदाबादेत मे महिन्यात ४९% लोकांत अँटिबॉडी आढळल्या. तेथे रुग्णांत सतत घट.

> पुण्यातील सर्वेक्षणात ५१.५% लोकांत अँटिबॉडी आढळल्या. पुणे देशातील सर्वात संक्रमित शहर आहे. मुंबई-अहमदाबाद उदाहरण म्हणून घेतले तर आगामी काळात पुण्यातही रुग्ण घटू शकतील.

बातम्या आणखी आहेत...