आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • If The Victim Had Not Been Alone, She Would Have Survived, Said A Woman Commission Member In The Badau Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लखनऊ:पीडिता एकटी नसती तर वाचली असती, बदायूप्रकरणी महिला आयोग सदस्याचे वक्तव्य

लखनऊ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदायूतील एका मंदिरात ५० वर्षांच्या महिलेवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या एक सदस्य चंद्रमुखी देवी यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, पीडिता एकटी मंदिरात गेली नसती तर ही घटना घडली नसती. त्या गुरुवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी बदायूत गेल्या होत्या.

त्या अशाही म्हणाल्या की, जर पोलिसांनी वेळीच कुटुंबीयांच्या माहितीवरून कारवाई केली असती तर बहुतेक मृतकाचा जीव वाचला असता. उत्तर प्रदेश सरकार अशा घटनांबाबत संवेदनशील आहे. मात्र, कोठे ना कोठे महिला अत्याचार प्रकरणात पोलिसांना आणखी संवेदनशील व्हावे लागेल.दरम्यान, मुख्य आरोपी सत्यनारायणचे खरे नाव सत्यवीर सिंह असल्याचे स्पष्ट झाले आहे. गावातील ज्या मंदिरात घटना घडली ते ८० वर्षे जुने आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, सत्यनारायण सात वर्षांपूर्वी गावात आला होता. त्याने गावातील लोकांना मंदिरात राहून पूजापाठ करण्याची विनंती केली होती. पुजारी तांत्रिक असल्याचाही दावा करायचा.

बातम्या आणखी आहेत...