आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • "If There Is No Plan For The Hungry, We Will Issue An Order," The Apex Court Said

नवी दिल्ली:‘भुकेल्यांसाठी योजना न आखल्यास आदेश देऊ’, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात भुकेल्या, बेघर व असहाय लोकांसाठी सामुदायिक स्वयंपाकघर उभारण्याच्या मागणीबाबत केंद्राकडून योग्य उत्तर न मिळाल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. उपसचिवांतर्फे दाखल शपथपत्रावर आक्षेप घेत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या न्यायपीठाने म्हटले की, ‘देशात लोक उपासमारीने मरत आहेत. केंद्र सरकार अशा लोकांच्या मदतीसाठी योजना तयार करत नाही. सरकारने योजना तयार केली नाही तर आम्हाला नाइलाजाने आदेश द्यावा लागेल.’

तत्पूर्वी, केंद्राने सांगितले की, राज्यांशी चर्चा होऊ शकली नाही. लवकरच चर्चा करू. नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीश म्हणाले,‘आम्ही असहाय लोकांच्या उपासमारीमुळे चिंतित आहोत. हे कुपोषण नव्हे, भुकेचे प्रकरण आहे. केंद्राने एकसमान धोरण तयार करावे, अशी आमची आम्ही शेवटची संधी देत आहोत. यानंतर सुनावणी टाळली जाणार नाही. तुम्हाला उपाशी लोकांची काळजी घेण्याची व लोकांना उपासमारीपासून वाचवण्याची इच्छा असेल तर कुठलेही राज्य या कल्याणकारी योजनेला नकार देऊ शकत नाही.’

बातम्या आणखी आहेत...