आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट वीज माेफत दिली जाईल. त्याचबराेबर थकबाकीदेखील माफ केली जाईल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.
आम आदमी पार्टीने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशनंतर आता उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीतील प्रचारास सुरुवात केली आहे. केजरीवाल रविवारी उत्तराखंडच्या दाैऱ्यावर आले आहेत. दिल्ली सरकारने दिल्लीत अशी याेजना लागू केली आहे. त्यास उत्तराखंडमध्ये का लागू केले जाऊ शकत नाही? दिल्ली सरकार १०० युनिटपर्यंत वीज खर्च करणाऱ्या कुटुंबांना १०० टक्के अनुदान देत आहे. २०१ ते ४०० युनिटचा वापर करणाऱ्या कुटुंबांना वीज बिलात ५० टक्के अनुदान देत आहे. उत्तराखंडमध्येही बुधवारी ऊर्जामंत्री हरक सिंह रावत यांनी दर महिन्याला १०० युनिट वीज माेफत दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
केजरीवालांना उत्तराखंडचा विकास नकाेय - भाजप
केजरीवालांवर आरोप करताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते दुष्यंत गाैतम म्हणाले, केजरीवालांना उत्तराखंडचा विकास करण्याची इच्छा नाही. ते म्हणाले, दिल्लीत केजरीवालांनी माेफत पाणी देण्याचे आश्वासन दिले हाेते. आज दिल्लीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. घराेघर जाऊन मद्य पाेहाेचवले जात आहे. यमुना अस्वच्छ झाली आहे. पाच वर्षांत नदीला स्वच्छ करण्याचे आश्वासन देण्यात आले हाेते. प्रत्यक्षात काहीही घडले नाही. जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.