आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • If You Don't Keep Minimum Balance In Banks, There Will Be A Charge, Waiting Tickets Won't Be Available In Railways

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून अनेक बदल:आता बँकेत मिनिमम बँलेंस नसेल तर लागेल चार्ज; यापूढे रेल्वेत वेटिंग तिकीट मिळणार नाही

जयपूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक-2 साठी दिशा-निर्देश जारी केले

1 जुलैपासून देशभरात अनलॉक-2 सुरू होईल. गृह मंत्रालयाने यासाठी नवीन दिशा-निर्देश जारी केले आहेत. यादरम्यान, बँकिंग क्षेत्रापासून ते रेल्वे विभागापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. आता 1 जुलैपासून बँक अनेक बँकींग चार्ज घेणे सुरू करणार आहे. 

एटीएम कॅश विड्राल चार्ज आणि मिनिमम अकाउंट बॅलेंस (एमएबी) मेंटिनंससारखे बँकींग चार्ज सरकारने 30 जूनपर्यंत थांबवले होते. पण, आता यावर बँक चार्ज घेणार आहे. याशिवाय रेल्वेमध्ये वेटिंग लिस्टचे तिकीट मिळणार नाही आणि अनेक स्पेशल ट्रेनच्या वेळा बदलण्यात येणार आहेत. तसेच, अटल पेंशन स्कीममध्येही ऑटो डेबिटची सुविधा सुरू होईल. जाणून घ्या आजपासून काय बदल होणार आहेत....

बँक: दुसऱ्या एटीएममधून पैसे काढल्यास चार्ज लागेल

बँक अकाउंटमध्ये ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे ठेवल्यास एमएबीच्या नावावर चार्ज घेतला जातो. जसे एसबीआयमध्ये मेट्रो आणि शहरी क्षेत्रात किमान बॅलेंस 3,000 रुपये ठेवावे लागतात. सेमी अर्बनमध्ये 2000 रु. आणि ग्रामीण परिसरात 1,000 रु. ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय एचडीएफसी आणि आयसीआयसीआयसारख्या खासगी बँकेत मेट्रो आणि शहरी क्षेत्रांसाठी 10 हजार रुपये एमएबी आहे. आता हे चार्ज परत सुरू होणार आहेत. याशिवाय आधीप्रमाणेच दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून ठरलेल्या वेळेपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास चार्ज भरावा लागेल. आता पूर्वीप्रमाणेच मेट्रो शहरात आठ आणि नॉन मेट्रो शहरात दहा ट्रांजेक्शन करता येतील. कोरोना व्हायरसमुळे बँकांनी अनेकवेळा पैसे काढण्यास परवानगी दिली होती.

1 जुलैपासून अनेक बँकात महत्वाचे डॉक्यूमेंट जमा न केल्यास ग्राहकांचे खाते फ्रीज केले जातील. बँक ऑफ बड़ौदासोबतच विजया बँक आणि देना बँकेतही हे नियम लागू असतील. विजया आणि देना बँकांचा बँक ऑफ बड़ोदामध्ये विलय झाला आहे.

रेलवे: तात्काळ तिकीट रद्द केल्यास 50% रिफंड मिळेल

1 जुलैपासून वेटिंग तिकीट बंद होत आहे. रेल्वेने निर्णय घेतला आहे की, यापुढे फक्त कंफर्म आणि आरएसी तिकीट दिले जाईल. तसेच, एक जुलैपासून अनेक ट्रेनच्या वेळा बदलणार आहेत. यापूर्वी रेल्वेचे तात्काळ तिकीट रद्द केल्यास कोणताच रिफंड मिळत नव्हता. पण, आता 1 जुलैपासून तात्काळ तिकीट रद्द केल्यास 50% रिफंड दिला जाईल.

अटल पेंशन योजनेत ऑटो डेबिट सुविधा सुरू होईल

केंद्र सरकारकडून अटल पेंशन योजना चालवली जाते, यात सध्या ऑटो डेबिट होत नाही. 30 जूनला हा कालावधी संपणार आहे. म्हणजेच, 1 जुलैपासून या योजनेत पैसे लावलेल्या लोकांचे पैसे आपोआप कट होतील. 

बातम्या आणखी आहेत...