आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If You Get Clean Air, Life Will Increase By 5 Years; China: 40% Reduction In Pollution, Increased Life Expectancy

प्रदूषणामुळे सरासरी वय 2 वर्षे घट:शुद्ध हवा मिळाल्यास आयुष्य 5 वर्षे वाढेल; चीन : प्रदूषणात 40%घट, आयुष्य वाढले नवी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात 99% लोक प्रदूषित हवेत श्वासोच्छ्वास करीत आहेत. यामुळे जगभरातील लोकांचे सरासरी वय 2.2 वर्षांनी घटले आहे. 117 देशांमध्ये 6 हजार पेक्षा अधिक शहरांमध्ये प्रदूषण मापन यंत्र लावण्यात आले आहे. तरीही या शहरांमधील लोकांना शुद्ध हवा मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. शिकागो विद्यापीठाने अलीकडेच जारी केलेल्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्सनुसार (हवेच्या गुणवत्तेवर आधारित जीवन निर्देशांक) भारताच्या नागरिकांना शुद्ध हवा मिळाल्यास त्यांच्या सरासरी वयामध्ये 5 वर्षांची वाढ होऊ शकते. चिंतेची गोष्ट म्हणजे दिल्लीतील प्रदूषणामुळे लोकांच्या सरासरी वयाची 10 वर्षे घटली आहेत. सन 2013 नंतर चीनने प्रदूषणात सुमारे 40 घट करून आपल्या नागरिकांच्या आयुष्याची सरासरी 2 वर्षांनी वाढवली आहे. दिल्ली एम्सचे निवृत्त संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांच्या मते, द लँसेंटच्या अभ्यासानुसार प्रदूषणामुळे श्वासोच्छ्वासाचे आजार होतात त्याचप्रमाणे ह्दयविकार आणि ब्रेन स्ट्रोक,गर्भपाताचाही धोका वाढला आहे. दरम्यान, प्रदुषणाविषयीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या १० नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

सर्व्हे; पेंढ्या हेच कारण, दिल्ली-एनसीआर 53% लोकांचे मत
{दिल्ली-एनसीआरच्या 53% लोकांच्या मते पंजाब, हरियाणा व यूपीच्या शेतकऱ्यांच्या पेंढ्या याच प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत.
{13% लोकांनीच गाड्यांच्या दूषित
हवेला प्रदूषणासाठी जबाबदार धरले
{7% लोकांनी कचरा जाळणे, कारखान्यांचे धूर व बांधकाम कारणीभूत असल्याचे म्हटले.
{56% लोकांचा
प्रदूषण नियंत्रणासाठी ऑड-इव्हन योजनेस विराेध
{38% लोक ऑड-इव्हन योजनेस अनुकूल.2021 मध्ये 35% होते.
स्रोत : लोकल सर्कल्सने दिल्ली-एनसीआरच्या 20 हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले. यात 61% पुुरुष आणि 39% महिलांचा सहभाग होता.

कृती आराखडा : सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा,कारची संख्या घटवा {आयआयटी-एम, पुणेच्या अभ्यासानुसार शाळा बंद करुन व ऑड-‌इव्हन योजनेसारखे आपत्कालीन उपाययोजनांमुळे प्रदुषणात 15% घट होऊ शकते. ते पुरेसे ठरणार नाही. {पर्यावरण विषयक तज्ञांच्या मते, प्रदुषणावर दिर्घकालीन उपाययोजना करताना लंडन,बिजिंग,मेक्सिको सिटी सारख्या शहरांकडून शिकवण घेणे रास्त ठरेल. {संयुक्त राष्ट्राने मेक्सिको सिटीला पृथ्वीवरील सर्वात प्रदुषित शहर घोषित केले होते. सन १९८९ मध्ये कारवर बंदी घालणारा हा पहिला देश ठरला. नंबर प्लेटच्या आधारवर कारला मंजुरी दिल्याने वाहनांची संख्या 20% घटली. {याशिवाय प्रदुषणाच्या वाढत्या पातळीबद्दल लोकांना वेळोवेळी सूचना देणारी यंत्रणा तयार करणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतूक स्वस्त करणे आणि त्यात सोयीसुविधा वाढवाव्या लागतील.त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची विशेषत: कारची संख्या घटेल.

दिवाळीत मुंबईपेक्षा औरंगाबादेत ६२ टक्के अधिक प्रदूषण
यंदाच्या दिवाळीत औरंगाबाद शहरामध्ये वायू प्रदूषणाची पातळी धाेक्याच्या पातळीवर हाेती. २२ ते २५ ऑक्टाेबर या चार दिवसांमध्ये औरंगाबादेत मुंबईच्या दुपटीपेक्षाही अधिक म्हणजे ६२ टक्के अधिक धूलिकणांचे प्रदूषण हाेते. तर नाशिकमध्ये मुंबईच्या तुलनेत ३८ टक्के अधिक प्रदूषण हाेते. श्वसनाद्वारे शरीरात सहज प्रवेश करू शकतील अशा १० मायक्राॅनपेक्षाही अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण औरंगाबादमध्ये ३७१ मायक्राेग्रॅम पर क्युबिक मीटर तर नाशिकमध्ये २२३ च्या पातळीवर हाेते.

बातम्या आणखी आहेत...