आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेनाचा संसर्ग काेणत्या व्यक्तीमध्ये किती धाेकादायक असेल, हे सध्यातरी स्पष्टपणे सांगता येऊ शकत नाही. परंतु काही विशिष्ट प्रकारच्या आजारात व्यक्तींसाठी संसर्ग जिवावर बेतणारा ठरू शकताे. नव्या संशाेधनानुसार मधुमेहामुळे डाेळ्यांचा आजार असलेली व्यक्ती काेराेना संसर्गामुळे गंभीर आजारी पडण्याचा धाेका असताे. सामान्य व्यक्तीच्या तुलनेत हा धाेका पाचपटीने जास्त असल्याचा दावा संशाेधकांनी केलाय.
किंग्ज काॅलेज लंडनच्या डायबिटिज रिसर्च अँड क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये प्रकाशित अहवालानुसार डायबेटिक रेटिनापॅथी व काेराेनाचा धाेका यामध्ये संबंध दिसून येत आहे. डाेळ्यांचा विकार हा मधुमेहींमधील गुंतागुंतीपैकी एक मानला जाताे. डाेळ्यातील रक्त वाहिन्यांना झालेल्या हानीमुळे हे घडून येते. २०१४ च्या एका अभ्यासानुसार टाइप-१ मधुमेहींमध्ये ५४.६ टक्के लाेकांमध्ये डाेळ्याची समस्या दिसून येते. टाइप-२ मधुमेहींमध्ये हे प्रमाण ३० टक्क्यांवर आहे.
सेंट थाॅमस एनएचएस फाउंडेशन ट्रस्टमध्ये १२ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान गंभीर रूपाने आजारी असलेल्या मधुमेहींपैकी ६७ टक्के व्यक्तींमध्ये डाेळ्यांची समस्या हाेती. त्यापैकी २६ टक्के व्हेंटिलेटरवर हाेते. हे आकडे सामान्य रुग्णांच्या तुलनेत पाचपट जास्त आहेत, असा दावा अहवालातून करण्यात आला आहे.
डाॅ. अँटाेनेला काॅर्सिलाे म्हणाल्या, मधुमेहात डाेळ्यांचेही विकार जडतात. त्यात रक्तवाहिन्यांची फार हानी हाेते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु काेराेना झाल्यावर रुग्णाला गंभीर आजारी पाडण्याची भूमिका हा घटक निभावताे. कारण गंभीर असलेल्या रुग्णांच्या फुप्फुसातील रक्त वाहिन्यांवर विषाणूंचा हल्ला हाेताे. त्यात वाहिन्यांची गंभीर हानी हाेते. त्यामुळे मधुमेही व काेराेना बाधित गुंतागुंतीची जास्त शिकार हाेतात.
मात्र रक्तवाहिन्या चांगल्या झालेला मधुमेही रुग्ण गंभीर आजारी पडण्याचा धाेका कमी असताे. डाेळ्यांचा आजार असलेल्या बाधित मधुमेहींमध्ये काेराेनामुळे श्वसनतंत्र निकामी हाेण्याचा धाेका जास्त असताे. म्हणूनच एखादी व्यक्ती बाधित झाल्यास त्याची मधुमेहाची हिस्ट्री तातडीने तपासली जावी. ते लक्षात घेऊनच उपचारपद्धती निश्चित करावी, असे संशाेधक टीमचे म्हणणे आहे. हा अहवाल आल्यामुळे मधुमेही लाेक काेराेनाचे गांभीर्य लक्षात घेतील व बचावाचे पुरेसे उपाय करतील, अशी अपेक्षाही संशाेधकांनी व्यक्त केली.
आयसाेलेशनची फीलिंग भूक लागण्यासारखी..
मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजीच्या संशाेधकांच्या म्हणण्यानुसार आयसाेलेशनमध्ये राहणाऱ्या लाेकांच्या भावना अगदी भूक लागलेल्या व्यक्तीसारख्या असतात. भूक लागल्यावर लाेकांना काहीतरी खाण्याची इच्छा हाेते. अगदी तसेच विलगीकरणात लाेकांना इतर लाेकांची तीव्र उणीव भासू लागते. दाेन्ही स्थितीत मेंदू न्युराॅलाॅजिक दृष्टिकाेनातून एकसारख्या अवस्थेत असताे. या संशाेधनाचे आकडे २०१८ व २०१९ मध्ये संकलित करण्यात आले हाेते. महामारीच्या आधीचा हा प्रकल्प हाेता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.