आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • If You Return The Plastic Bottle To The Shopkeeper Without Throwing It In The Trash, You Will Get The Money

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठी तयारी:प्लास्टिक बाटली कचराकुंडीत न फेकता दुकानदाराला परत दिल्यास मिळतील पैसे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अन्न पॅकेजिंग करणारे प्लास्टिक रिसायकल करतील

पर्यावरणातील वाढता प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) वन व पर्यावरण मंत्रालयाकडे खाद्यपदार्थांचे प्लास्टिक पॅकेट रिसायकल करण्याची परवानगी मागितली आहे. ग्राहकाने प्लास्टिक बाटली कचऱ्यात फेकण्याऐवजी दुकानदाराला परत दिल्यास पैसे देण्याची योजना एफएसएसएआय आखत आहे.

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या बंदीमुळे प्लास्टिकमध्ये पॅक खाद्यपदार्थाच्या वापरानंतर त्या प्लास्टिकचा पुन्हा वापर करता येत नाही. एफएसएसएआयने मंत्रालयाला पत्र लिहून ही बंदी हटवण्याची मागणी केली आहे. एफएसएसएआयनुसार देशात जे खाद्यपदार्थ प्लास्टिक पाकिटात मिळतात त्यात ४३ टक्के सिंगल यूज प्लास्टिक आहे. रिसायकलिंगमुळे समस्या सुटू शकते.

एफएसएसएआय कंपन्यांसोबत बैठक घेऊन जबाबदारी सोपवेल
प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रुल्स- २०१८ अंतर्गत सिंगल यूज प्लास्टिकला रिसायकल करण्यावर बंदी घातली होती. ते वातावरणात प्लास्टिक कचरा वाढण्याचे मोठे कारण ठरले. एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी सांगितले, आम्ही पाकीटबंद अन्न उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत बैठक घेत आहोत. यात कंपन्यांना ही जबाबदारी दिली जाईल की, प्लास्टिक बाटली दुकानदाराला परत देणाऱ्या ग्राहकाला काही पैसे द्यावेत. तसेच दुकानातून त्या बाटल्या घेण्याची व्यवस्था कंपन्यांनी करावी.

बातम्या आणखी आहेत...