आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय बालमजुरीविरोधी दिनाचे औचित्य साधून राज्यातील ग्रामविकास व कामगार, मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेला आवाहन केले की, १४ वर्षाखालील लहान मुले शाळेत न जाता कुठे काम करताना दिसली तर तत्काळ नजकीकच्या कामगार आयुक्त कार्यालयास अथवा हेल्पलाइन क्र. १०९८वर कळवावे. नाव गुप्त ठेवे जाईल. १४ वर्षाखाली मुलांना घटनेने शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आहे. त्याकरिता राज्यात १४ वर्षाखालील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. लहान मुलांनी शाळेत शिकून स्वत:चे व त्यायोगे देशाचे भविष्य उज्ज्वल करावे, ही त्यामागची प्रामाणिक इच्छा आहे. बालमजुरी ही एक विघातक सामाजिक अनिष्ठ प्रथा आहे. काही समाजकंटक आपल्या हितासाठी या मुलांना कामावर ठेवतात. अशा लोकांची माहिती द्यावी. आपण एकत्र येत महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करुया.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.