आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'If You Want To Go For A Walk', Threatens To Kill Karnataka Chief Justice Attorney's Claim | Marathi News

धक्कादायक:हिजाब वादावर निर्णय देणार्‍या न्यायाधीशांना 'Y' सिक्युरिटी, कर्नाटक उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांना धमकी; वकिलाचा दावा

बंगळूरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशामध्ये सध्या राजकीय चर्चेत असणारे हिजाब प्रकरण अद्याप शांत झालेले नसताना यात आणखी एका प्रकरणाची भर पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 15 मार्च रोजी हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना ही धमकी मिळाली आहे. सोशल मीडियावर धमकीचा एक व्हिडिओ समोर आल्याचे वृत्त आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ मेसेज आल्याचा आरोप वकील उमापती एस. यांनी केला आहे. ज्यामध्ये न्या. रितू राज अवस्थी यांना ‘हत्येची धमकी’ देण्यात आली आहे, असा दावा करयात येत आहे.

कर्नाटकातील बहुतांश भागात हिजाब हा वादाचा मुद्दा बनला होता. त्यामुळे हे प्रकरण अखेर न्यायालयात गेले होते. त्यानंतर न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, 'हिजाब ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही. वकिलाने एका वृत्त वाहिनीशी बोलतांना सांगितले की, 'व्हिडिओ पाहून मला धक्का बसला आणि म्हणून मी ताबडतोब (उच्च न्यायालय) रजिस्ट्रारशी संपर्क साधला.'

व्हिडिओ संदेश तमिळ भाषेत
वकिलाने आरोप केला आहे की हा व्हिडिओ 'तामिळनाडू (बहुधा मदुराई जिल्हा) येथून पाठवण्यात आला आहे.' धमकीमध्ये झारखंडच्या न्यायाधीशांच्या हत्येचाही उल्लेख आहे. हिजाबबाबत न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...