आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If You Want To Save The Party, Remove Amarinder, Jakhar, Bajwa Punjab Congress Politics

पंजाब काँग्रेसमध्ये खेचाखेची:पक्ष वाचवायचा असल्यास अमरिंदर,जाखड यांनाहटवा, बाजवा यांचा पवित्रा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थान : सहा बसपा आमदारांना नोटीस

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या विरोधात काँग्रेसच्या दोन राज्यसभा सदस्यांनी मोर्चा उघडला आहे. प्रतापसिंग बाजवा आणि शमशेर सिंग ढुलो अशी त्यांची नावे आहेत. पक्षातील वादंगावर बाजवा म्हणाले, राज्यातील पक्षाला वाचवायचे असल्यास अमरिंदर व प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांना पदावरून हटवले पाहिजे. पक्षश्रेष्ठींनी तसा निर्णय घेतला नाहीतर सिद्धार्थ राय (बंगालचे माजी मुख्यमंत्री) यांच्यानंतर झालेल्या घटनेची पंजाबमध्येही पुनरावृत्ती होऊ शकते, इशाराही बाजव यांनी दिला आहे. दोन खासदारांच्या आरोपानंतर त्यांच्यावर शिस्तपालन समिती योग्य तो निर्णय घेईल, असे प्रदेश प्रभारी आशा कुमारी यांनी स्पष्ट केले. ए.के. अँटोनी हे समितीचे अध्यक्ष आहेत. पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्र्यांनी विषारी दारूच्या प्रकरणात राज्य सरकारवर टीका केल्यावरून गुरूवारी बाजवा व ढुलो यांची काँग्रेसमधून हकालपट्टीची मागणी केली होती.

राजस्थान : सहा बसपा आमदारांना नोटीस
बसपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे सहा आमदार राजस्थानातील राजकारणाचे केंद्र बनले आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहाही आमदारांना जैसलमेल येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी नोटीस पाठवून बोलावण्यात आले होते. पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत विधायकांना नोटीस देण्यात आली. त्यांना ११ ऑगस्ट रोजी पीठासमोर जबाब द्यावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...