आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If You Want To Travel To Himachal, You Need 5 Days Booking, Covid Test Report Is Required

पर्यटनाला मंजुरी:हिमाचल फिरायचे असेल तर 5 दिवस बुकिंग गरजेचे, कोविड चाचणी रिपोर्ट आवश्यक

पूनम भारद्वाज | सिमला2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 दिवसांनंतर स्वागत, पर्यटकांना येण्यास हिमाचलची मंजुरी

तब्बल १०० दिवसानंतर हिमाचल प्रदेशात पर्यटकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने देवभूमीत येणाऱ्यांसाठी सीमा खुल्या केल्या आहेत. शुक्रवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राने यासंबंधी आदेश काढले आहेत. आता पर्यटन विभाग पर्यटकांसाठी लवकरच मार्गदर्शक तत्वे काढणार आहे. यामुळे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. अनलॉक-२ दरम्यान हॉटेल व्यावसायिकांनी सरकारकडे मार्गदर्शक तत्वे आखून देण्याची मागणी केली होती. पर्यटकांनी ५ दिवसाचे बुकिंग करावे, ७२ तासापूर्वीचा कोविड चाचणी अहवाल आणावा, असे म्हटले आहे.

मान्यता प्राप्त लॅबचा अहवाल आवश्यक

सरकारच्या आदेशानुसार, येथे येणाऱ्या पर्यटकांकडे ७२ तासांपूर्वीचा आयसीएमआरकडून मान्यता असलेल्या लॅबचा चाचणी अहवाल असणे आवश्यक आहे. अहवाल सोबत असल्यास क्वारंटाइन होण्याची गरज नाही. तथापि, पर्यटकांसाठी हॉटेल खुले करण्यावरून हॉटेल मालकांत मतभिन्नता आहे. देशातील अन्य राज्यांनी पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतल्याने, हिमाचलने यासाठी तयारी करायला हवी, असे एका गटाला वाटते. तर दुसऱ्या गटाने आणखी थोडी प्रतिक्षा करायला हवी, असे म्हटले आहे. कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे परराज्यांतून येणाऱ्या लोकांसाठी सीमा खुल्या करू नयेत. यामुळे हिमाचलमध्येच कोरोना बाधितांची संख्या वाढेल, असे या गटाचे मत आहे. तर पर्यटकांना कमीत कमी पाच दिवसांची बुकिंग करूनच येथे यावे लागेल. सरकारने हा नियम अनिवार्य केला आहे. शिवाय हिमाचल प्रदेशात येण्यासाठी त्यांनी ई-कोविड पासमध्ये स्वत:ची नोंदणी करून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...