आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी 'द कश्मीर फाइल्स' हा अश्लील आणि प्रोपगंडा करणारा चित्रपट असल्याचे म्हटले आहे. गोव्यात आयोजित 53व्या चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी त्यांनी सोमवारी हे वक्तव्य केले होते. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. तर त्यांच्या वक्तव्याला आणखी तीन ज्युरींनी समर्थन दिले आहे. ज्युरी सदस्य जिन्को गोटोह, पास्कल चावेंस, जेवियर एंगुलो बारटुरेन यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये लिहिले की, ज्युरी प्रमुख म्हणून लॅपिड जे काही बोलले ते संपूर्ण ज्युरीला माहीत आहे आणि आम्ही त्याच्याशी सहमत आहोत.
याशिवाय, त्यांनी दावा केला की लॅपिड यांचे वैयक्तिक विधान होते. तर या निवेदनात कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय चित्रपट निर्माते सुदीप्तो सेन यांचे नाव नाही.
लॅपिड यांचे म्हणणे हे पंडितांची शोकांतिका नाकारणारे नव्हते
ते म्हणाले की, लॅपिडने हे देखील स्पष्ट केले आहे की, काश्मिरी पंडितांच्या शोकांतिका नाकारण्याचा त्यांचा हेतू नव्हता. परंतु केवळ चित्रपटाच्या सिनेमॅटिक हाताळणीवर त्यांनी भाष्य केले. ही शोकांतिका एका गंभीर चित्रपटास पात्र आहे. तसेच लॅपिडने आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे.
ते म्हणाले की, कार्यक्रमाच्या समारोप समारंभात ज्युरी प्रमुख लॅपिड यांनी ज्युरी सदस्यांच्या वतीने निवेदन दिले. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “द कश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहून आम्ही सर्व व्यथित आणि आश्चर्यचकित झालो. आम्हाला हा चित्रपट अश्लील आणि अपप्रचारावर आधारित वाटला. अशा प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवासाठी हा चित्रपट योग्य नाही आणि आम्ही त्यांच्या या वक्तव्यावर ठाम आहोत.
राजकारण झाल्याने वाईट वाटले
आम्ही चित्रपटाच्या स्टोरीवर राजकीय भूमिका घेतलेली नाही. आम्ही फक्त एक कलात्मक विधान केले. मात्र या मुद्द्यावर आधी राजकारण झाले आणि नंतर नदव यांच्यावर वैयक्तिक हल्ले झाले. या गोष्टीचे आम्हाला दुःख झाले आहे. ज्युरीचा असा कोणताही हेतू नव्हता.
जिंको गोटोह ऑस्कर नामांकित अमेरिकन निर्माता आहे. जेवियर एंगुलो बार्टुरन हे फ्रान्समधील डॉक्युमेंटरी चित्रपट निर्माता आणि पत्रकार आहेत. जेवियर एंगुलो बार्टुरन हे फ्रान्सचे चित्रपट संपादक आहेत.
द कश्मीर फाइल्ससंदर्भातील आणखी बातम्या वाचा...
दिव्य मराठी इंडेप्थ:'द कश्मीर फाइल्स'ला भाजप शासित राज्यांत टॅक्स फ्री करण्यावरून प्रोपगंडाचा आरोप; वाचा चित्रपटांत राजकीय हस्तक्षेपाचा इतिहास
दिव्य मराठी इंडेप्थमध्ये जाणून घ्या, सिनेसृष्टीच्या वर्तुळात राजकारणाचा केव्हा प्रवेश झाला? त्याचे परिणाम काय झाले? कसा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात सिनेमाचा प्रोपगंडा म्हणून वापर होत राहिला आहे? वाचा सविस्तर
'द कश्मीर फाइल्स' वादावर इस्रायली राजदूतांना धमकी
'द कश्मीर फाइल्स' चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांना देश सोडण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यांनी शनिवारी याबाबत ट्विटरवर माहिती दिली. पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट मध्ये त्यांना देश सोडण्याची धमकी देण्यात आलेली आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.