आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना किट:आयआयटी दिल्लीने तयार केले जगातील सर्वात स्वस्त कोरोना किट, 399 रुपयांच्या किटचे नाव ठेवले 'कोरोश्योर'

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किटला एचआरडी मिनिस्टर रमेश पोखरियाल आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बुधवारी लॉन्च केले

आयआयटी दिल्लीने जगातील सर्वात स्वस्त कोरोना किट तयार केली आहे. या किटला 'कोरोश्योर' नाव दिले आहे. संस्थेने याला दिल्लीतील फर्म न्यूटेक मेडिकल डिवाइसच्या साथीने तयार केले आहे. किटला एचआरडी मिनिस्टर रमेश पोखरियाल आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बुधवारी  लॉन्च केले.

650 रुपयात होईल चाचणी

आयआयटी दिल्लीने एका किटची किंमत 399 रुपये ठेवली आहे, पण बाजारात कंपनी न्यूटेक मेडिकल डिवाइसेस याची किंमत किती ठेवेल, याची घोषणा अद्याप झाली नाही. किटला आयसीएमआर आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अप्रूवल मिळाले आहे. आयआयटी दिल्लीनुसार, किटच्या किमतीसोबत आरएनए आयसोलेशन आणि लॅब चार्जला जोडले जाईल. हे सर्व मिळून एका कोरोना चाचणीसाठी 650 रुपये लागतील.

आयसीएमआरच्या अधिकृत लॅबमध्ये उपलब्ध असेल

आरटी-पीसीआर आधारित हे कोरोना किट आयसीएमआरच्या अधिकृत लॅबमध्ये उपलब्ध असेल. यातून होणारी चाचणी बाजारात उपलब्ध असलेल्या चाचणीपेक्षा स्वस्त असेल. आयआयटी दिल्लीने किटला तयार करण्यासाठी देशातील 10 कंपन्यांना लायसेंस दिले आहे.