आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IIT Kanpur Claims: Corona Third Wave Is Not Possible, 15,000 New Patients Will Remain Daily Till October

कोरोना:आयआयटी कानपूरचा दावा : तिसऱ्या लाटेची शक्यता नसल्यात जमा, ऑक्टोबरपर्यंत रोज 15,000 नवे रुग्ण राहतील

कानपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. अशात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. यादरम्यान दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवणाऱ्या आयआयटी कानपूरने देशात तिसऱ्या लाटेची शक्यता नसल्यात जमा असल्याचा दिलासा दिला आहे. आयआयटीचे प्रा. महेंद्र अग्रवाल यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या गणितीय मॉडेल सूत्रानुसार, लसीकरणाने तिसऱ्या लाटेची शक्यता जवळपास संपवली आहे. मात्र, आयसीएमआर व एनटागीशी संबंधित शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपण कोविड प्रतिबंधक बाबींचे पालन करू तेव्हाच तिसऱ्या लाटेची शक्यता संपुष्टात येईल. मुलांना संसर्ग होण्याच्या मुद्द‌्यावर या शास्त्रज्ञांनी मोठ्याप्रमाणेच त्याचे स्वरूप राहू शकते, मात्र ते धोकादायक नसेल, असे भाकीत वर्तवले आहे.

आयआयटी कानपूरचे प्रा. अग्रवाल म्हणाले, लसीकरण वाढल्याने संसर्ग नियंत्रणात आहे. दिल्ली, यूपी, बिहारसारखे राज्ये संसर्गमुक्त होत आहेत. ऑक्टोबरपर्यंत रोज नव्या रुग्णांची संख्या १५,००० च्या जवळपास राहील. ईशान्येतील राज्ये व तािमळनाडू, तेलंगणा व केरळचा वाढता संसर्ग हे त्यामागचे कारण आहे.

मुलांत संसर्गाचा धोका जास्त होण्याची भीती चुकीची
कोरोनाची तिसरी लाट कधी व कशी येईल हे सांगणे कठीण आहे. मात्र, गर्दी रोखल्यास तिसरी लाट टाळली जाऊ शकते. तिसऱ्या लाटेत मुलांना फटका बसण्याची शक्यता खूप कमी आहे. शाळा सुरू करण्यात अडचण नाही. -प्रा. नरेंद्र अरोरा, चेअरमन, एनटागी

मुले आजारी पडली तरी संसर्ग जास्त तीव्र स्वरूपाचा नसेल
तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. मुलांमध्येही संसर्ग प्रौढांच्या प्रमाणात दिसली. बहुतांश मुलांमध्ये लक्षण नसलेला संसर्ग झाला. मुले आजारी पडतील, टक्केवारी कमी होईल, मात्र प्रत्यक्ष संख्या जास्त असू शकते. त्यामुळे त्याची तयारी केली पाहिजे. मात्र, आजार तीव्र नसेल, त्यामुळे चिंता नाही. -प्रा.के.श्रीनाथ रेड्‌डी,सदस्य,कोविड टेक्निकल टास्क फोर्स,आयसीएमआर

हळूहळू शाळा सुरू केल्या पाहिजेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यानही युरोपातील अनेक देशांत प्राथमिक शाळा बंद केल्या नव्हत्या. मुलांमध्ये संसर्गाशी लढण्याची क्षमता प्रौढांच्या तुलनेत जास्त असते. कोविड प्रतिबंधिक नियम पाळल्यास तिसरी लाट टाळू शकतो. - प्रा. बलराम भार्गव, महासंचालक, आयसीएमआर

बातम्या आणखी आहेत...