आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IIT Kanpur Study By July, The Second Wave Of Corona Would Be Over, But The Peak Time Had Advanced; The Third Wave Will Knock In October, 3 Points To Escape

कोरोनावर IIT प्रोफेसरचे 2 दावे:जुलैपर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरणार, ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट ठेवणार पाऊल; बचावासाठी 3 टिप्सही दिल्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक राज्यात पीकचा कालावधी ठरलेला नाही

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अजुनही सुरूच आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या प्रिंसिपल साइंटिफिक एडवाइजर विजय राघवन यांनी तिसरी लाट येण्याची शंका व्यक्त केली आहे. सरकारच्या या शंकेवर IIT कानपूरचे प्रोफेसर यांनीही शिक्कामोर्तब केला आहे.

कोरोनाच्या आकड्यांचे एनालिसिस करत असलेले प्रद्मश्री प्रो. मणिंद्र अग्रवाल यांनी दावा केला आहे की, जुलैपर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपेल. हे चांगले वृत्त आहे. मात्र दुसरा दावा भीती पसरवणारा आहे. कोरोनाचा डेटा एनालिसिस केल्यानंतर कळाले की, ऑक्टोबरपासूनच तिसरी लाटही सुरु होईल.

दरम्यान तिसरी लाट किती मोठी आणि भयावह असेल याविषयी या अभ्यासात समजू शकलेले नाही. प्रो. अग्रवाल यांनी सांगितले की, ही सामान्य लाट असू शकते. मात्र हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. यामुळे आपण आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहायला हवे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक कालावधी पुढे गेला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये आकड्यांच्या आधारावर आपण पीक काळ कोणता असेल याविषयी अंदाज लावू शकतो. तसेच देशात कोरोना केसमध्ये कधी घट होईल हे देखील समजू शकेल. दुसरी लाट संपण्याच्या 2-3 महिन्यानंतर तिसरी लाट येईल. - पद्मश्री डॉ. मणिंद्र अग्रवाल, प्रोफेसर, IIT कानपूर

दुसऱ्या लाटेचा पीक कालावधी पुढे ढकलला
देशात दुसऱ्या लाटेच्या पीकचा कालावधी पुढे ढकलला आहे. आता हा पीक 10-15 मे ऐवजी पुढचे एक दोन आठवडे शिफ्ट होत असल्याचे दिसत आहे. प्रो. अग्रवाल यांनी सांगितले की, ही चिंतेची बाब आहे. खरे तर यावर नजर ठेवायला हवी. पीक कधी येईल हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. पीक आल्यानंतर कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या झपाट्याने कमी होईल.

अनेक राज्यात पीकचा कालावधी ठरलेला नाही
प्रो. अग्रवाल यांनी सांगितले की, सध्या ओडिशा, आसाम आणि पंजाबच्या पीकचा काळ स्पष्ट होऊ शकलेला नाही. यासाठी काही काळ थांबावे लागेल. पुढचे काही दिवस डेटा एनालिसिस केल्यानंतर याविषयी कळेल. या व्यतिरिक्त दिल्ली आणि मध्यप्रदेशचा पीक आला आहे. तर हरियाणामध्ये पीकचा कालावधी पुढे ढकलला आहे.

3 टिप्स ज्यामुळे कोरोनाची तिसरी लाट कमी केली जाऊ शकते

  • सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येला लस दिली जाईल.
  • नवीन व्हेरिएंट्सची लवकर ओळख करुन त्यांना थांबवले जावे.
  • ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंचवर जास्त फोकस करा.
बातम्या आणखी आहेत...