आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयआयटी मद्रास व आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांना वर्ष २०२२-२३ दरम्यान बंपर प्री-प्लेसमेंट ऑफर (पीपीओओ) मिळाले आहेत. गेल्या वर्षी २०२१-२२ मध्ये आयआयटी-मद्रासच्या विद्यार्थ्यांना वर्षभर एकूण २३१ ऑफर मिळाल्या होत्या. यंदा आतापर्यंत ३३३ ऑफर मिळाले आहेत. अशा प्रकारे आयआयटी-गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांना वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण १७९ प्लेसमेंट ऑफर मिळाल्या होत्या. यंदा आतापर्यंत २१८ प्री-प्लेसमेंट ऑफर आहेत. दोन्ही आयआयटीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचा पहिला टप्पा १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
दोन्ही आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक ऑफ कोर इंजिनिअरिंग व रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्रातून मिळाल्या आहेत. गुवाहाटीत पीपीओमध्ये कमाल सीटीसीचे ऑफर गेल्या वर्षीच्या ऑफरहून दुपटीवर गेल्या आहेत. २०२१-२२ मध्ये येथे सर्वाधिक सीटीसीची ऑफर ५६ लाख रुपये होती. यंदा सर्वाधिक १.२० कोटी आहे. आयआयटी-मद्रासचे सल्लागार (प्लेसमेंट) प्रो. सत्यन म्हणाले, पीपीओमध्ये सर्वाधिक वाढीचे श्रेय संस्थेच्या दमदार इंटर्नशिप कार्यक्रमाला जाते. आम्ही जास्तीत जास्त कंपन्यांना इंटर्नशिपसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी दीर्घ मुलाखतीद्वारे त्यांचे मूल्यांकन करणे सोपे होते. त्यांना पीपीओ देण्यात सुलभता येते. विद्यार्थ्यांद्वारे पीपीओ स्वीकार केल्याने विद्यार्थी व कंपनीच नव्हे तर संस्थेची प्रतिमादेखील बळकट होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.