आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IIT Testing Kits, Making Ventilators; Work Also Continues On Vaccines And Antimicrobial Clothing

कोरोना आणि तंत्रज्ञान:आयआयटी टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर बनवताहेत; लस आणि कोरोनानाशक कपड्यांवरही काम सुरू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान संस्था काय करत आहेत?

देशात २३ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आहेत, त्या सर्वात प्रतिष्ठित संस्था मानल्या जातात. त्या सगळ्या कोरोना विषाणूविरोधात लढण्यात मदत करताहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, १८ आयआयटीमध्ये कोरोना विषाणूशी संबंधित २०८ संशोधन आणि विकास (आर अॅण्ड डी) प्रकल्प सुरू आहेत. त्यात सर्वात जास्त पीपीई आणि सॅनिटायझेशनबाबत काम सुरू आहे. हे सर्व प्रकल्प सुमारे १८ महिने चालतील आणि त्यावर १२० कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. आयआयटीने तयार केलेल्या काही गॅजेट्स, उत्पादनांचा वापर सुरूही झाला आहे. काहींच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी मदतीची गरज आहे.आयआयटी काय बनवताहेत ते पाहू-

दिल्ली >स्वस्त टेस्टिंग किट बनवली, आयसीएमआरची मंजुरी

आयआयटी दिल्लीने कमी किमतीत कोविड-१९ टेस्टिंग किट बनवले आहे. त्याला इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चकडून (आयसीएमआर) मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे टेस्टिंग किटसाठी आयएमसीआरची परवानगी मिळालेली दिल्ली आयआयटी ही पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे. आयआयटीने किटचे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वत:च तयार केले आहे आणि त्याची किंमतही खूपच कमी आहे. आयआयटी आता त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी पार्टनरच्या शोधात आहे. दिल्ली आयआयटीच्या संशोधकांनी PRACRITI (प्रकृती) हे संकेतस्थळही बनवले आहे, ते जिल्हा आणि राज्य स्तरावर संक्रमणाचा दर सांगू शकते. ते तीन आठवड्यांपर्यंतचा अंदाजही व्यक्त करू शकते. त्यामुळे सरकारी संस्थांना व्यूहरचना तयार करण्यास मदत होईल.

कानपूर >सर्व वस्तू डिसइन्फेक्ट करेल कोरोना किलर बॉक्स

आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी ‘कोरोना किलर बॉक्स’ तयार केला आहे, आपण सामान्यपणे जे आवश्यक साहित्य बाहेरून घरी आणतो ते सर्व तो बॉक्स सॅनिटाइझ करू शकतो. उदा. भाज्या, फळे, साखर, दूध, मोबाइल, पैसे आणि चाव्या. अल्ट्राव्हायलेट लाइट तंत्रज्ञानावर आधारित हा बॉक्स एका मिनिटात वस्तू सॅनिटाइझ करू शकतो. बॉक्सची अंदाजित किंमत ५ हजार रुपये आहे. आयआयटी त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा प्रयत्न करत आहे. 

मद्रास >कपड्यांवर कोरोना नष्ट करणारे कोटिंग बनवतेय

आयआयटी मद्रासकडून मदत मिळालेल्या स्टार्टअप म्यूज वियरेबल्स कपड्यासाठी एक कोटिंग तयार करत आहे. याच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना विषाणू निष्क्रीय होतील. हे कोटिंग नॅनोपार्टिकल तंत्रावर आधारित आहे. ते अँटी बॅक्टीरिअल असेल. कोटिंग असणारे कापड ६० वेळा धुता येईल. यापासून एन ९५ मास्क, पीपीई, फूड पॅकेजिंग बॅग्स तयार करता येतात. कोटिंग असणाऱ्या या कापडाचR या आठवड्यात चाचणी होण्याची शक्यता आहे. यापासून तयार मास्कची किंमत ३०० रुपये असू शकते.  

रूरकी >पीपीई नसलेलेे कोविड-१९ स्क्रीनिंग बूथ बनवले

रूरकी महापालिकेच्या सहकार्याने आयआयटी रूरकीने नमुने गोळा करण्यासाठी कोविड-१९ स्क्रिनिंग बूथ तयार केले आहे. याची किंमत अतिशय कमी आहे. विशेष बाब म्हणजे, या बूथने नमुने घेण्यासाठी पीपीई घालायची गरज नाही. म्हणजे पीपीई घालण्यात खर्च होणारा वेळ आणि नवीन पीपीईच्या खर्चाची बचत होईल. आयआयटी रुडकीचे प्राध्यापक डॉ. कमल जैन यांनी एक आय सॉफ्टवेअर बनवले आहे. जे एक्स-रेच्या मदतीने कोरोनाचे निदान करु शकते.  त्यांचा दावा आहे की, यामुळे टेस्टिंत स्वस्त होतील. डॉ. जैन यावर गेल्या ३ वर्षांपासून काम करत आहेत. सध्या त्यांच्या तंत्राचा सक्सेेस रेट ९० टक्क्यांपर्यंत आहे. हे ६० हजार एक्स-रेंच्या अभ्यासानंतर बनवले आहे. ते आता यासाठी पेंटट फाइल करतील.

रोपड >आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘निगेटिव्ह प्रेशर रूम’

रोप़ड आयआयटीने‘निगेटिव्ह प्रेशर रूम’चे (एनपीआर) डिझाइन तयार केले आहे. यामुळे आयसोलेशन वार्डमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्गापासून वाचवता येणे शक्य होईल. एनपीआर म्हणजे विशेष पद्धतीने तयार केलेल्या खोल्या असतात. यात विषाणू हवेच्या माध्यमातून रुग्ण व स्टाफपर्यंत पोहोचू शकत नाही. हे एका व्हेंटिलेशन सिस्टिमच्या मदतीने होते. अशी खोली तयार करण्यासाठी ९००० रुपयांचा खर्च येतो. दक्षिण कोरियातील रुग्णालयांमध्ये एनपीआर या प्रणालीचा वापर करण्यात आला होता. या तंत्राने आयआयटी रोपडने कंटेनमेंट बॉक्सही बनवला आहे. याची किंमत जवळपास ५०० रुपये आहे.

मुंबई >केवळ १० हजार रुपयांत ‘रूहदार’ व्हेंटिलेटर केले तयार

आयआयटी मुंबईमधील ५ काश्मिरी विद्यार्थ्यांनी ‘रूहदार’ नावाचे एक स्वस्त व्हेंटिलेटर बनवले आहे. याची किंमत जवळपास १० हजार रुपये आहे. या उत्पादनाची जास्त मागणी झाल्यास ही किंमत आणखी बरीच कमी होऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे. ते तयार करण्यासाठी डिझाइन इनोव्हेशन सेंटर, पुलवामाने या विद्यार्थ्यांना मदत केली. या शिवाय आयआयटी मुंबईशी जोडलेल्या अनेक स्टार्टअपनीही विविध तंत्रत्रान तयार करून त्यांना मदत केली आहे. यात रुग्णांना औषध देणे आणि त्यांच्याशी चर्चा करणाऱ्या रोबोटिक स्मार्ट ट्रॉली आणि फेशियल रिकॉग्नीशनसह टेम्परेचर सेंसिंग असणारे डिव्हाइस जे ऑफिस आणि मॉलसारख्या ठिकाणी रुग्णांची ओळख पटवण्यासाठी वापरता येतील, असे सांगण्यात आले. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत या आयआयटीही करत आहेत मदत

भुवनेश्वर >येथेही आयआयटी कानपूरप्रमाणेच वस्तूंना सॅनिटाइझ करणारा बॉक्स तयार करण्यात आला आहे. हा बॉक्स अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या तंत्रज्ञानावर काम करतो. संस्थेचा दावा आहे की या चेंबरमध्ये ठेवलेली कोणतीही वस्तू १५ मिनिटांत निर्जंतुक होते. यात मास्क, पीपीई किटसारख्या वस्तूही निर्जंतुक करता येतात.

इंदूर >संस्थेचे संशोधक ६ संशोधन उपक्रमांवर काम करत आहेत. यात ऑप्टिकल टेम्परेचर सेन्सर, स्टरलायझेशन चेंबर आणि पृष्ठभागाच्या निर्जंतुकीकरणासाठी फोटो डिटेक्टर्ससारख्या उपकरणांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त येथील विद्यार्थ्यांनी थ्रीडी प्रिंटेड मास्कदेखील तयार केले आहेत. ते धुऊन पुन्हा वापरता येतात. याबरोबरच चेहऱ्याच्या आकाराप्रमाणेही हे मास्क तयार करता येतात. कोरोना व्हायरसवरील लस शोधण्यावरही संस्था काम करत आहे. 

खरगपूर >अडकलेल्या विदेशी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी येथे ऑनलाइन फोरम तयार केली आहे. यावर मदत मागणाऱ्यांना ऑफिस ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स (ओआयआर) मदत करते.

गुवाहाटी >ही संस्था हेस्टर बायोसायन्सेसबरोबरच कोविड-१९ च्या लसीवर काम करत आहे. यावर्षअखेरीपर्यंत या लसीच्या प्राण्यांवरील चाचणीपर्यंत पोहोचू, अशी संस्थेला आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...