आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचे गंभीर आरोप:म्हणाले - सोमय्यांच्या संस्थेला 172 कंपन्यांकडून संशयास्पद देणग्या, ईडी चौकशी करेल काय?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला 172 कंपन्यांकडून संशयास्पद देणग्या देण्यात आला, असा गंभीर आरोप आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. आज पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा सोमय्यांवर हल्ला चढवला.

किरीट सोमय्या हे कंपन्यांकडून खंडणीच्या स्वरुपात पैसे मिळवतात. तपास संस्थांचा धाक दाखवून त्यांनी 150 हून अधिक व्यापारी, बिल्डर यांच्याकडून निधी गोळा केला आहे. आपल्याकडे अशा 172 कंपन्यांची नावे आहेत, ज्यांनी खंडणीस्वरुपात किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठाणला निधी दिला. हळुहळू आपण ही सर्व प्रकरणे बाहेर काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

ईडीच्या रडारवरील कंपनीकडून लाखोंचा निधी
किरीट सोमय्या यांचा आणखी एक घोटाळा आपण कागदपत्रांसह उघड करणार आहोत, असे संजय राऊत यांनी काल सांगितले होते. त्यासंदर्भात राऊत म्हणाले, सोमय्यांच्या संंस्थेला कोलकातामधील मेट्रो डायरी या कंपनीकडून लाखोंचा निधी देण्यात आला आहे. भ्रष्टाचाराप्रकरणी या कंपनीची सीबीआय व ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. त्याच कंपनीकडून सोमय्यांना लाखोंचा निधी देण्यात आला. किरीट सोमय्या नेहमी इतरांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. मग भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या कंपनीकडून त्यांनी निधी कसा घेतला. हा व्यावहार संशयास्पद असून ईडीने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

युवक प्रतिष्ठान सोमय्यांच्या कुटुंबीयांच्याच नावावर
ज्या युवक प्रतिष्ठानला कंपन्यांनी लाखोंचा संशयास्पद निधी दिला, ते प्रतिष्ठान सोमय्या कुटुंबीयांच्याच नावावर आहे. प्रतिष्ठानने कोणाकोणाकडून संशयास्पद देणग्या मिळवल्या, असा सवाल केल्यास कुटुंबाची प्रतिष्ठा कशी काय जाते, असा सवालही संजय राऊत यांनी केला. कालच किरीट सोमय्यांनी संजय राऊतांविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात अब्रुनूकसानीची तक्रार दाखल केली आहे. बिनबुडाचे आरोप करून राऊत आपल्या कुटुंबाची बदनामी करत असल्याचे तक्रारीत सोमय्यांनी म्हटले आहे. त्यालाच संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...