आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हवामान:3 जूनला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये धडकेल वादळ, हवामान खात्याचा अंदाज- 1 किंवा 2 जूनला मानसून केरळमध्ये येणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्कायमेटने शनिवारी दावा केला होता की, दक्षिण-पश्चिम मानसूनने केरळमध्ये आगमन केले आहे
  • केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर आणि लक्षद्वीपमध्ये तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे

हवामान विभागाने रविवारी परत एकदा दावा केला आहे की, मानसून आतापर्यंत केरळमध्ये आलेला नाही. हवामान विभागाचे संचालक एम. मोहपात्रा यांनी सांगितले की, आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत. मानसून एक जूननंतर येण्यासाठी परिस्थिती चांगली आहे. यापूर्वी, खासगी हवामान एजेंसी स्कायमेटने शनिवारी दावा केला होता की, दक्षिण-पश्चिम मानसूनने केरळमध्ये धडक मारली आहे. 

मोहपात्रा यांनी सांगितले की, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात आणि लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र बनत आहेत. आम्हाला आशा आहे की, दुसऱ्या दिवशी हा अजून वाढेल आणि सायक्लोनमध्ये बदलेल. हा उत्तरेकडे येईल आणि गुजरातजवळ पोहचेल. त्यानंतर, 3 जूनला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येईल.

हवामान विभागाने शनिवारी सांगितले होते की, मानसून-पूर्वचा पाऊस आणि एक किंवा दोन जूनला मानसून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. शनिवारी हा मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात सक्रिय आहे आणि दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व अरबी सागराकडे येत आहे आणि यामुळेच परिस्थिती मानसूनसाठी चांगली बनली आहे.

स्कायमेटचे म्हणने आहे मानसून आला

स्कायमेटने शनिवारी दावा केला होता की, 30 मे (शनिवार) मानसूनचे केरळच्या किनारपट्टीवर आगमन झाले. तर, हवामान विभागाने एप्रिलमध्ये सांगितले होते की, मानसून सरासरी असेल. विभागाने सांगितल्यानुसार, 96 ते 100% पावसाला सामान्य मानसून म्हटले जाते.

0