आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • IMF Asia's Growth Rate Will Be 0% In 2020 Due To The Corona, The Worst Figure In The Last 60 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा अंदाज:कोरोनामुळे 2020 मध्ये आशियातील विकासदर 0% असेल, मागील 60 वर्षातील सर्वात खराब आकडा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयएमएफच्या आशिया-पॅसिफिक विभागाचे डायरेक्टर म्हणाले की, असे संकट यापूर्वी कधीच आले नाही

कोरोना व्हायरस (कोविड-19) संक्रमणामुळे कॅलेंडर ईअर 2020 मध्ये आशियात विकासदर 0 % असेल. हा विकासदर 1960 नंतरचा सर्वात कमी आहे. हा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) ने व्यक्त केला आहे. बुधवारी रात्री एका व्हर्चुअल प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये आयएमएफच्या एशिया अँड पॅसिफिक विभागाचे डायरेक्टर चांग्योंग री म्हणाले की, असे संकट यापूर्वी कधीच आले नाही. हे जागतिक आर्थिक संकटापेक्षाही वाईट आहे. आशियातील सर्व देशांमध्ये यातून वाचण्याचा मार्ग नाही.

60 वर्षातील सर्वात खराब विकास दर

री पुढे म्हणाले की, या भागात 2020 मध्ये विकासदर 60 वर्षातील सर्वात खराब असण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात जागतिक आर्थिक संकटावेळी विकासदर 4.7 टक्के आणि एशियन आर्थिक संकटावेळी 1.3 टक्के होता. परंतू, ते पुढे म्हणाले की, अॅक्टिविटीच्या बाबतीत आशिया इतर क्षेत्रापेक्षा चांगली परिस्थिती आहे. आयएमएफकडून गुरुवारी जारी नवीन वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुकमध्ये 2020 मध्ये ग्लोबल इकोनॉमी वेगाने कमी होऊन 3 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुकमध्ये सांगण्यात आले आहे की, अॅडवांस्ड अर्थव्यवस्था 6.1 टक्क्याने कमी होईल, तर त्याला उभारी देण्यासाठी बाजार आणि विकसनशील अर्थव्यवस्था 1 टक्के कमी होईल.

2020 मध्ये भारत आणि चीनला होईल फायदा

जागतित स्तरावर नकारात्मक वृद्धीशिवाय आयएमएफने 2020 मध्ये आशियातील उभारी घेत असलेल्या विकसनशील देशांमध्ये 1 टक्के ग्रोथ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आयएमएफने म्हटले की, यावर्षी चीन 1.2 आणि भारत 1.9 टक्क्यांची मध्यम दराने ग्रोथ करतील. री म्हणाले की, 2021 मध्ये ग्रोथ रेट वाढण्याची शक्यता आता सांगता येत नाही. री पुढे म्हणाले की, जर कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील आणि प्रोत्साहन पॅकेजसोबतच पक्की रणनिती बनवली गेली, तर आशिया वेगाने ग्रोथ करेल. 

कोरोनावरील उपाययोजनांसाठी भारताचे कौतुक

आयएमएफने कोरोना व्हायरस ‘कोविड 19’ महामारीचे संक्रमण रोखण्यासाठी भारत सरकारकडून देशातील लॉकडाउनच्या निर्णयाला ‘विवेकपूर्ण’ म्हणत, कौतुक केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंतर आयएमएफ दुसरी मोठी आँतरराष्ट्रीय संस्था आहे, ज्यांनी भारताच्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे. री म्हणाले की, लॉकडाउनमुले विकासदर कमी होईल, पण हा एक चांगला निर्णय आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय रिझर्व बँकेने चांगले उपाय केले आहेत, पण संकट कमी न झाल्यास अजून जास्त काम करावे लागेल. भारत के पास इतनी गुंजाइश है कि वह सबसे जरूरी काम पर पहले ध्यान दे।

बार्कलेजने 0 % विकासदराचा अंदाज व्यक्त केला

ब्रिटेनमधील प्रमुख बँक बार्कलेजने कॅलेंडर ईअर 2020 मध्ये भारताची जीडीपी ग्रोथ शून्य टक्क्यांवर येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी बार्कलेज बँकने 2020 मद्ये जीडीपी ग्रोथ 2.5 राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवला आहे. बार्कलेजकडून मंगळवारी जारी एका रिसर्च नोटमध्ये सांगण्यात आले आहे की, लॉकडाउनचा मायनिंग, अॅग्रीकल्चर, मेन्युफॅक्चरिंग आणि यूटीलिटी सेक्टरवर जास्त वाइट परिणाम पडेल. बार्कलेजनुसार हे आर्थिक नुकसान 234.4 बिलियन डॉलर (अंदाजे 17 लाख कोटी रुपये)किंवा जीडीपीच्या 8.1 टक्क्यांबरोबर आहे.

बातम्या आणखी आहेत...