आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना लसीकरण:परदेशी जाणाऱ्यांसाठी आता मिळेल जन्मतारीख असलेले लस प्रमाणपत्र

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र आता जन्मतारखेच्या पूर्ण उल्लेखासह जारी केले जाईल. परदेशी जाणाऱ्यांसाठी विशेषत्वाने ही सुविधा दिली जाणार आहे. येत्या आठवड्यापासून ही सुविधा सुरू होऊ शकते. ती पूर्णपणे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचआे) निकषांनुरूप असेल. सध्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्रात इतर विवरणांसह जन्म वर्षाच्या आधारे फक्त वयाचाच उल्लेख असतो. मात्र आता काेविनमध्ये नवी सुविधा आणली जाईल. त्यानुसार ‘कोविशील्ड’चे दोन्ही डोस घेतलेले आणि परदेशी जाण्यास इच्छुक लोकांसाठी नवे प्रमाणपत्र जारी जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...