आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Immune System Does Not Increase Due To Two Doses Then Third Dose, A Booster Dose If Needed

भास्कर रिसर्च:दोन डोसमुळे रोगप्रतिकारशक्ती न वाढल्यास तिसरा डोस, कमी झाल्यास बूस्टर डोसची गरज

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात काेराेनाच्या विराेधात बूस्टर डोस घेण्यावरून चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने देशातील नागरिकांना तिसरा डोस घेण्याची परवानगी दिली आहे. ६५ वर्षांवरील केलेल्यांना किंवा रुग्णालयात दाखल ५४ ते ६५ वर्षांच्या लाेकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. याअगाेदर फ्रान्स,जर्मनी, झेक रिपब्लिकसह १० हून जास्त देशांनीदेखील बूस्टर शॉटची मंजुरी दिली आहे. बूस्टर डाेस ,तिसऱ्या डाेसबद्दल जाणून घेऊया...

थर्ड डाेस व बूस्टर डाेसमध्ये फरक काय?
यूएस डिपार्टमेंट आॅफ वेटरन अफेयर्सनुसार लसीचा तिसरा किंवा अतिरिक्त खुराक दाेन डोस घेतलेल्यांना असेल. परंतु दाेन डोस घेऊनही रोगप्रतिकारशक्ती वाढू न शकलेल्यांना तिसरा डोस लागू असेल. क्लिव्हलँड क्लिनिक क्यू अँड एच्या डाॅ. मिशेल मदिना म्हणाल्या, राेगप्रतिकारकशक्ती पुरेशी नसलेल्या लाेकांसाठी ताे असेल. विशिष्ट कालावधीनंतर प्रतिकारशक्ती कमी हाेण्याची शक्यता वाटल्यास त्यांच्यासाठी बूस्टर शाॅट आहे. उदाहरणार्थ- डेल्टासारख्या नव्या स्वरूपामुळे लसीची प्रतिकारशक्ती कमी हाेण्याची भीती असेल. तेव्हा बूस्टर शाॅट असताे. खाद्य तथा आैषधी प्रशासनाने आॅगस्टमध्ये काही लाेकांना फायझरचा अतिरिक्त तिसऱ्या डोससाठी परवानगी दिली हाेती.

तिसरा डाेस कधी दिला जाताे, बूस्टर डोस कधी देता येईल?
दुसरा डाेस घेतल्याच्या २८ दिवसांनंतर तिसरा डोस घेता येताे. बूस्टर डाेस सामान्यपणे एका निश्चित वेळेनंतर दिला जाताे. पहिल्या दाेन डाेसनंतर बूस्टर डाेस दिला जावा, असे काही गरजेचे नाही. परंतु शरीरातील अँटिबाॅडीजची पातळी लक्षात घेऊन ताे दिला जाताे.

काेणाला तिसऱ्या डोस व बूस्टरची गरज असते?
सगळ्या लाेकांना तिसऱ्या डोसची गरज नसते. उदाहरणार्थ -१५ वर्षांपर्यंतच्या किशाेरवयीन वर्गाला त्याची गरज नाही. परंतु जास्त वयातील लाेकांना तिसरा डोस लागू शकताे. म्हणजेच राेगाशी लढण्याच्या क्षमतेच्या आधारे तिसऱ्या डोसचे महत्त्व ठरवता येईल.
एफडीए, सीडीसी हे दाेन्ही अजूनही निराेगी लाेकांसाठी बूस्टर डाेस देण्याबद्दलची परीक्षणे करत आहेत. त्यात या वर्षी जानेवारी व फेब्रुवारीत काेराेनाचे दाेन डाेस घेतलेले,पुन्हा बाधित न झालेल्यांना बुस्टरची गरज नाही. परंतु दाेन्ही डोसनंतरही बाधितांना बूस्टर डाेस घेण्याची गरज आहे.

सर्वांसाठी तिसरा डाेस किंवा बूस्टर डोसचा कालावधी निश्चित आहे?
नाही. तिसरा डाेस व बूस्टर दाेन्ही राेगप्रतिकारशक्ती लक्षात घेऊन ठरवावे लागते. हे डाेस लवकर किंवा उशिराही दिले जाऊ शकतात.

राेगप्रतिकारशक्ती चांगली किंवा पुरेशी नाही हे कसे समजेल?
राेगप्रतिकारशक्ती चांगली किंवा पुरेशी नाही याबद्दल निश्चित सांगता येत नाही. कारण अँटिबाॅडीजही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.

बूस्टर डोस लावण्यात उरुग्वो, तुर्की पुढो
दोश लोकसंख्योला बूस्टर

उरुग्वो 24.12%
चिली 15.33%
तुर्की 12.59%
फ्रान्स 1.31%
अमोरिका 0.7%
जर्मनी 0.65%
इटली 0.05%
जग 0.32%
स्रोत: अवर वर्ल्ड इन डोटा.

बातम्या आणखी आहेत...