आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका रुग्णालयाच्या अध्ययनातील दावा:प्रदूषणाचा फटका, धूम्रपान न करणाऱ्यांनाही कर्करोगाची भीती

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुप्फुसाचा कर्कराेग आता तरुण, धूम्रपान न करणाऱ्यांनाही होत आहे. फुप्फुसाचा कर्करोग झालेल्यांपैकी ५० टक्के लोकांना धूम्रपानाची सवय नाही, असे अध्ययनातून दिसून आले आहे. त्यापैकी ७० टक्क्यांचे वय ५० वर्षांहून कमी आहे. ३० वर्षांहून कमी वयाच्या मुलांचा त्यात समावेश होतो. हे अध्ययन मेदांता रुग्णालयाचे डॉ. अरविंदकुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मार्च २०१२ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान आलेल्या फुप्फुसाचा कर्करोग असलेल्या ३०४ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. डॉ. अरविंद म्हणाले, फुप्फुसाचा कर्करोग अत्यंत धोकादायक आजार आहे. पीडित पाच वर्षे जगण्याची शक्यता वर्तवली जाते. ८० टक्के रुग्णांना हा आजार झाल्याचे विलंबाने लक्षात येते. त्या वेळी उपयोग होत नाही. २० टक्के रुग्णांचे वय ५० वर्षे आहे. महिला रुग्णांचे प्रमाण ३० टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...