आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकव्याप्त काश्मीरचे (पीआेके) कथित पंतप्रधान सरदार तन्वीर इलियास यांचे विधानसभा सदस्यत्व इस्लामाबाद उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. अवमान प्रकरणात कोर्टाने त्यांना दोषी ठरवताना हा आदेश दिला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे ते निकटवर्तीय म्हणून आेळखले जातात. ते पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे नेते आहेत.एका कार्यक्रमात इलियास यांनी अप्रत्यक्षपणे न्यायपालिकेवर आरोप केला होता. सरकारच्या कामकाजावर न्यायपालिका प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आदेशांद्वारे कार्यपालिकेच्या क्षेत्रात हस्तक्षेप करतात असे आरोप त्यांनी केले होते. त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचाही आरोप झाला होता. मंगळवारी इलियास कोर्टात हजर झाले आणि त्यांनी क्षमायाचना केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.