आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शासन निर्णयाचा विरोध:प्रतिकात्मकरित्या बकरी ईद साजरी करण्याला इम्तियाज जलील यांचा विरोध, म्हणाले - मग राम मंदिराचं भूमिपूजनही प्रतिकात्मक करा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व सण उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध आणले आहे. याच  पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुस्लिम बांधवांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र आता याला एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांना हे सर्व मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बकरी ईदच का प्रतिकात्मक साजरी करायची? असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन करावं, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. 

इम्तियाज जलील यांनी बकरी ईदवर घातलेल्या निर्बंधांचा विरोध केला आहे. याविषयावर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.  जलील म्हणाले की, खेड्या पाट्यावरुन लोक आपली जनावरं घेऊन येत असतात. त्यांनी काय करायचं? यावेळी त्यांनी बकरे खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेलाही विरोध केला. श्रीमंतांकडे स्मार्ट फोन आहेत. ते लोक ऑनलाइन पद्धतीने बकऱ्यांची खरेदी विक्री करू शकतील. मात्र गरीब शेतकऱ्यांनी काय करायचे? असा सवालही त्यांनी केला आहे.  यासोबतच ज्यांच्याकडे केवळ एक-दोन बकरे असतात, त्यासाठी त्यांनी आता काय यासाठी फोन घ्यायचा का? असा सवालही त्यांनी केला आहे.