आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी १० वर्षांत (२०३१-३२ पर्यंत) अमेरिका-चीननंतर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. सध्या ती पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. मॉर्गन स्टॅनली यांचा अंदाज आहे की, या काळात देशात दरडोई उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त आणि शेअर बाजाराचे भांडवल तिप्पट होईल.
अर्थव्यवस्थेत तेजी ६३९ लाख कोटींवर जाईल जीडीपी गत आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी २५५.५ लाख कोटी रु. होता. २०३२ पर्यंत तो ६३९ लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
या तीन कारणांनी होईल असे १. भारत ७-८% विकास दर गाठणार, पण ब्रिटन, जर्मनी, फ्रान्समध्ये ते ३-४% राहील. २. इन्फ्रावर खर्च वाढेल, नोकरीच्या संधी. ३. महागाई घटून ३% ते ४% राहील, यामुळे घरगुती बचतीत चांगली वाढ होईल. (मदन सबनवीस, चीफ इकोनॉमिस्ट, बडोदा बँक)
किरकोळ बाजार वाढेल १५० लाख कोटींचे रिटेल मार्केट आगामी एक दशकात रिटेल मार्केट १४७.६४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. सध्या ते ६२.८७ लाख कोटी रुपयांचे आहे. या तीन कारणांनी होईल असे १. शहरी ग्राहकाची खरेदी क्षमता वार्षिक १२-१५% वाढण्याची शक्यता आहे. २. भारताकडे वळत आहेत ग्लोबल ब्रँड. ३. नव्या काळातील टेक कंपन्यांत तरुणांना तगड्या वेतनाची नोकरी मिळत आहे. (स्रोत : बोस्टन कंसल्टिंग ग्रुप)
ग्राहकही मजबूत होतील : उत्पन्न ब्रिटन-जर्मनीपेक्षा जास्त आगामी दशकात दरडोई उतपन्न वाढून २.३ पट होण्याचा अंदाज आहे. सीईआयसी आणि मॉर्गन स्टॅनली संशोधनाचे आकडे सांगतात, १९८१-८२ मध्ये दरडोई उत्पन्न २१,७०० रुपये होते. गत आर्थिक वर्षात ते १.८३ लाखांपेक्षा थोडे जास्त होते. सध्याचा वेग कायम राहिल्यास ते ४.२२ लाखांपर्यंत पोहोचू शकते. ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्समध्ये ते दीडपट इतकेच वाढेल.
{महिलांची भागीदारी वाढेल : आगामी एक दशकात एकूण कार्यरत लोकसंख्येत महिलांचा वाटा ३५% पेक्षा वर असेल. तो २०२१ मध्ये २५% इतकाच होता. {मोठी उसळी : ५५% अधिक किमतीचे मोबाइल निर्यात : आयसीईएचा अंदाज आहे की, चालू आर्थिक वर्षात देश ७३,००० कोटींची मोबाइल निर्यात करेल. गत वर्षी ती ४७,००० कोटी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.