आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In 2019 20, A Total Of Rs 5,958 Crore Was Spent On Prisons And Rs 2,061 Crore On Prisoners

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुरुंगांवरील खर्च:देशातील प्रत्येक कैद्यावर दररोज 118 रुपये खर्च, तुरुंगांवर सर्वाधिक खर्च करण्यात उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र आघाडीवर

धर्मेंद्रसिंह भदौरिया|नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019-20 मध्ये तुरुंगांवर एकूण 5958 कोटी, कैद्यांवर 2061 कोटी खर्च

तुरुंगातील जगाची सामान्य लोकांना कल्पना नसते. एनसीआरबीच्या अहवालात देशातील तुरुंगांची स्थिती नेमकी कशी आहे, हे लक्षात आले आहे. त्यानुसार देशातील १३५० तुरुंगांत २०१९-२० यादरम्यान एकूण ५ हजार ९५८ कोटी रुपये खर्च झाले. त्यातही कैद्यांवरील एकूण खर्च सुमारे २०६०.९६ कोटी रुपये आहे. वर्ष २०१९ च्या अखेरीस देशातील तुरुंगांत सुमारे ४.७८ लाखांहून जास्त कैदी होते. अशा प्रकारे तुरुंगांतील दररोज प्रतिदिवशी सुमारे ११८ रुपये खर्च झाला.

मंजूर बजेट खर्चाहून सुमारे ८६० कोटी रुपयांहून कमी राहिला. एकूण तुरुंग कर्मचाऱ्यांपैकी निम्म्यांहून जास्त जणांकडे निवासाची सुविधा आहे. कैद्यांवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी ९८६ कोटी रुपये केवळ भोजनावर खर्च होतात. त्यानंतर सुमारे ८९.४८ कोटी रुपयांचा खर्च औषधीवर होतो. २४ कोटी रुपयांहून जास्त कैद्यांच्या प्रशिक्षणावर आणि शिक्षणावर खर्च केले जातात. कैद्यांच्या कपड्यांवर २२.५६ कोटी रुपये खर्च केले जातात. त्याशिवाय कैद्यांच्या कल्याणकारी योजनांवर २०.२७ कोटी रुपये खर्च होतात.

खर्च करण्यात उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र आघाडीवर

डिसेंबर २०१९ पर्यंत ८०८ तुरुंगात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सुरू झाली होती. तुरुंगांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या राज्यांत उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१९-२० दरम्यान सुमारे ६७५ कोटी रुपयांहून जास्त खर्च करण्यात आले. देशांतील तुरुंगांतील एकूण अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या ६० हजार ७९० एवढी आहे. सुमारे २७ हजार जागा रिक्त आहेत.