आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In 2024 No Matter Which Face From The Opposition, There Is No Problem Mamata; News And Live Updates

ममतांचा दिल्ली दौरा:2024 मध्ये विरोधी पक्षांतून कुठलाही चेहरा असला तरी अडचण नाही - ममता; सोनिया गांधींना भेटल्यानंतर वक्तव्य

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ममता बॅनर्जी यांनी केजरीवाल यांचीही घेतली भेट

संसद अधिवेशनादरम्यान पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आलेल्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. सोनियांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर ममता म्हणाल्या, ‘काँग्रेस अध्यक्षांनी मला चहापानासाठी बोलावले होते. राहुल गांधीही उपस्थित होते. आम्ही सध्याची राजकीय स्थिती, पेगासस हेरगिरी, कोरोनाची स्थिती आणि विरोधकांची एकजूट या मुद्द्यांवर चर्चा केली. भेट चांगली झाली. तिचे सकारात्मक परिणाम दिसतील.’ सायंकाळी उशिरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ममतांची भेट घेतली.

विरोधी पक्षांच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर ममता म्हणाल्या की,‘भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मी एकटी काही करू शकत नाही. मी ज्योतिषी नाही. चेहरा थोपवण्याची इच्छा नाही. विरोधकांकडून दुसरा चेहरा आला तरी मला अडचण नाही. मला नेता व्हायची इच्छा नाही, तर सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करायचे आहे. विरोधकांच्या आघाडीसाठी सर्वांनी गंभीरपणे काम केले तर सहा महिन्यांतच परिणाम दिसू शकतात. सोनियांनाही विरोधकांची एकजूट हवी आहे.

नरेंद्र मोदींना पाहून हिंदीत सुधारणा झाली
ममता बॅनर्जी यांनी हिंदीत सुधारणा झाल्याचे गुपितही सांगितले. तुमची हिंदी एवढी चांगली कशी झाली, या पत्रकारांच्या प्रश्नावर ममता म्हणाल्या, ‘नरेंद्र मोदींना पाहून माझी हिंदी सुधारली, अमित शहांना पाहून गुजराती समजू लागली.’

बातम्या आणखी आहेत...