आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In 21 Days, Uttarakhand Received 546%, Delhi 339%, Bihar 234%, Haryana 139% And Rajasthan 108% More Rainfall.

ॲनालिसिस:21 दिवसांत उत्तराखंड 546%, दिल्लीत 339%, बिहारमध्ये 234%, हरियाणात 139%व राजस्थानात 108% जास्त पाऊस

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्माएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनच्या समाप्तीनंतरही देशाच्या विविध भागांत पाऊस सुरू आहे. यामुळे ऑक्टाेबरच्या २१ दिवसांत १९ राज्यांत ५४६% जास्त, दिल्लीत ३३९%, बिहारमध्ये २३४% आणि उत्तर प्रदेशात १९३% जास्त पावसाची नोंद झाली आहे. उत्तराखंडमध्ये ऑक्टोबरच्या २१ तारखेपर्यंत सर्वसाधारणपणे ३१ मिमी पाऊस होतो. मात्र, या वेळी २०२ मिमी पाऊस नोंदला आहे. एवढेच नव्हे तर नैऋत्य मान्सूनला देशातून निरोप देण्याची तारीख १५ ऑक्टोबर असते. मात्र, आता तो २३ ऑक्टोबरला जाण्याची शक्यता आहे. या वेळी मान्सूनने सामान्य तारीख १७ सप्टेंबरच्या तुलनेत ६ ऑक्टोबरला निरोप घेण्यास सुरुवात केली. यानंतर राजस्थानात सुरुवात होऊन १२ ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत पोहोचला. मात्र, यानंतर भारताच्या दोन्ही सागरी किनाऱ्यांवर दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने अडकला.

महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये ३७% पाऊस ; सर्वाधिक पाऊस जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यात
औरंगाबाद | राज्यात एक ते २२ ऑक्टोबर या काळात सरासरीच्या ३७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. राज्यात या काळात ६२.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना ९२.३ मिमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात याच काळात ४८ टक्के जास्त, मराठवाड्यात ५७ टक्के जास्त तर विदर्भात सरासरीच्या १९ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. राज्यात या काळात सर्वाधिक पाऊस जळगाव जिल्ह्यात (१७१ टक्के ) झाला .त्या पाठोपाठ औरंगाबाद (१२७ टक्के ), वाशिम (१२६%), ठाणे (११८%), धुळे (११३%) अशी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात राज्यात थंडी वाढत असून शुक्रवारी सर्वात कमी १४.८ अंश सेल्सिअस तापमान नाशिक येथे नोंदण्यात आले.

उत्तराखंड : शंभरवर अडकले, अनेक बेपत्ता, काही मृतांची ओळख नाही
डेहराडून | उत्तराखंडमध्ये झालेल्या मोठ्या बर्फवष्टीमुळे ट्रेकर्सचा गट बेपत्ता झाला आहे. बागेश्वरच्या सुंदरढंुगा हिमनदीच्या ट्रेकिंगवर गेलेल्या ४ ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. कफनी ग्लेशियरकडील २० ट्रेकर्सचा गटही बेपत्ता आहे. पिंडारी ट्रेकिंग मार्गावर द्वालीत अडकलेल्या ४२ लोकांना प्रशासनाने सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये काही विदेशीही आहेत. सरमूलमध्येही काही जण अडकले होते. त्यांना सुरक्षित काढले आहे. उत्तरकाशीच्या हर्षिल-छितकुल लम्खागा पासवर ७ पर्यटकांचे मृतदेह आढळले आहेत. प्रशासनाला बुधवारी रात्री केएमव्हीएन गेस्ट हाऊसमध्ये ट्रेकर्ससह ३४ जण अडकल्याची माहिती मिळाली होती. त्यात १८ भारतीय, ६ विदेशी पर्यटक आहेत. कफनी ग्लेशियरवर गेलेले २० लोक बेपत्ता आहेत. ९ बिहार रेजिमेंटचे कर्नल राजेंद्र प्रसाद म्हणाले, पर्यटकांच्या शोधासाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. खोऱ्यातील ढाकर हेलिपॅडवरून लष्कराच्या हेलिकॉप्टरने ४२ पर्यटकांपैकी १३ जणांना धारचुलाला पोहोचवले. २९ पर्यटक अद्यापही ढाकर हेलिपॅडवर अडकले आहेत.

मान्सून संपल्यानंतर सर्व प्रमुख राज्यांत जास्त पाऊस, चारमध्ये कमी
आगामी दिवसांत बंगालच्या खाडीत हवेची दिशा बदलेल आणि ईशान्य हवा सुरू होईल. हवामान विभागानुसार, २६ ऑक्टोबरला आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत ईशान्य मान्सून दाखल होईल. यानंतर दक्षिणेतील राज्यांत पाऊस सुरू होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...