आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने काँग्रेसवर ताजा हल्ला करताना रविवारी ‘काँग्रेस फाइल्स’ नावाच्या मालिकेतील पहिला भाग जाहीर केला. त्यात संपुआ सरकाच्या कार्यकाळात झालेले भ्रष्टाचार-घोटाळ्यांचा उल्लेख केला. सोशल मीडियावर जाहीर केलेल्या ‘काँग्रेस म्हणजे करप्शन’ शीर्षकाच्या व्हिडिआे संदेशात काँग्रेसच्या सत्ताकाळात कशा प्रकारे भ्रष्टाचार व घोटाळे झाले होते हे सांगण्यात आले. त्यात ४८,२०,६९,००,००,००० (४८ खर्व २० अब्ज ६९ कोटी) रुपयांचा आकडा सांगण्यात आला. परंतु हा आकडा एखाद्या लहान देशाची अर्थव्यवस्था किंवा विकास याेजनेचा पैसा नसून जनतेच्या खिशातून केलेल्या पैशांची ही लूट असल्याचा दावा भाजपने केला आहे.
काँग्रेसने आपल्या कार्यकाळात ७० वर्षांत भ्रष्टाचार व घाेटाळ्यांतून जनतेच्या श्रमाच्या पैशांची लूट केली. या पैशांतून देशाच्या सुरक्षेपासून विकासापर्यंतची कितीतरी कामे झाली असती. व्हिडिआेनुसार एवढ्या रकमेतून २४ आयएनएस विक्रांत, ३०० राफेल विमाने, १००० मंगळ मिशन करता आले असते किंवा खरेदी झाली असती. काेळसा, २ जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल घाेटाळ्याचा उल्लेख : भाजपने काँग्रेस सरकारच्या शेवटच्या दहा वर्षांची चर्चा केली. व्हीव्हीआयपी हेलिकाॅप्टर खरेदीत ३५० काेटींची लाच घेणे, एक लाख ८६ हजार काेटी रुपयांचा काेळसा घाेटाळा, १ काेटी ७६ लाख काेटींचा २ जी स्पेक्ट्रम घाेटाळा आदींचाही उल्लेख आहे.
राहुल आज सुरतमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींनी रविवारी साेनिया गांधींची भेट घेतली. उभय नेते एका हाॅटेलात भेटले. साेबत राॅबर्ट वढेराही हाेते. राहुल सुरतला जाण्याची शक्यता आहे. तेथे ते मानहानीच्या प्रकरणात दाेषी ठरवणे आणि दाेन वर्षांच्या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान देतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.