आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In 80 Years The Country’s Temperature Will Rise By 4.40, The Heat Will Quadruple; The More Storms Come, The Higher The Sea Level Rises By 1 Foot

हवामान:80 वर्षांत देशाचे तापमान 4.40 वाढेल, उष्णतेत चारपट वाढहोईल; वादळे जास्त येतील, समुद्राची पाणीपातळी 1 फूट वाढेल

नवी दिल्ली (अनिरुद्ध शर्मा)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान बदलाच्या परिणामांविषयी पुणे आयआयटीएमने तयार केला पहिला अहवाल
Advertisement
Advertisement

२१०० सालापर्यंत देशाचे सरासरी तापमान ४.४ अंशांपर्यंत वाढेल, तर उष्णतेच्या लाटांची तीव्रता तीन ते चारपटीने वाढेल. तसेच समुद्रातील पाणीपातळीही १ फूट वाढणार आहे. वादळाची तीव्रता व संख्याही वाढणार असल्याचा खुलासा हवामान बदलाविषयीचा भारतातील पहिल्या अहवालात करण्यात आला आहे. ‘असेसमेंट ऑफ क्लायमेट चेंज ओव्हर द इंडियन रिजन’ हा अहवाल विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन आज जारी करतील. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजीने हा अहवाल तयार केला आहे. अहवालाचे दर चार ते पाच वर्षांनी परीक्षण केले जाईल.

अहवालानुसार, १९८६ पासून ते २०१५ दरम्यान सर्वात उष्ण दिवसाच्या (कमाल) व सर्वात थंड दिवसाच्या (किमान) तापमानात अनुक्रमे ०.६३ अंश व ०.४ अंश वाढ झाली आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास १९७६ ते २००५ च्या तुलनेत २१०० सालापर्यंत यात ५५ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ होईल. म्हणजेच या शतकाच्या शेवटपर्यंत या दोन्ही तापमानात अनुक्रमे ४.७ व ५.५ अंश वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन घटवण्यासाठी कोणतेही पाऊल न उचलणे हा परिस्थिती अशीच राहण्याचा अर्थ आहे. १९५१ ते २०१५ दरम्यान मोसमी पाऊस ६% घटला आहे. विशेषत: गंगेचे मैदानी प्रदेश व पश्चिम घाट भागात पाऊस जास्त घटला आहे. मध्य भारतात अतिवृष्टीचे प्रमाण ७५ % वाढले आहे. १९५१ पासून ते १९८० च्या तुलनेत १९८१ ते २०११ मध्ये दुष्काळाच्या घटना २७ टक्के वाढल्या आहेत. अहवालात मुंबई, कोलकातासारख्या महानगरांत पुरासाठी हवामान बदल, शहरीकरण, समुद्रातील पाणीपातळी वाढणे कारणीभूत असल्याचे नमूद आहे. मध्य भारतातील ओलसर क्षेत्राचे आता दुष्काळग्रस्त भागात रूपांतर झाले आहे. अहवालानुसार, पू्र्व किनारपट्टी, प.बंगाल, गुजरात, मुंबई, कोलकाता व चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये पुराचा धोका वाढला आहे.

इकोसिस्टिम, शेती व पाण्याच्या स्राेतावर जास्त होईल बदलाचा परिणाम

देशातील वातावरणात वेगाने होणाऱ्या बदलाचा परिणाम इकोसिस्टिम, शेतीतील उत्पादन, ताज्या पाण्याच्या स्रोतावर जास्त होईल. तसेच पायाभूत सुविधाही नष्ट होतील. यामुळे देशातील जैवविविधता, खाद्य, पाणी, ऊर्जा संरक्षण व आरोग्यावर वाईट परिणाम होईल. तीव्र हवामानाच्या घटना (खूप जास्त तापमान) वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे उष्माघात, हृदय व मज्जासंस्थेशी संबंधित आजार आणि मानसिक विकार वाढतील.

Advertisement
0