आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In A Remote Village, Children Were Not Coming To School, And The Teacher Took The Student Number From 13 To 70 In The Lockdown

जम्मू-काश्मीरहून ग्राउंड रिपोर्ट:दुर्गम गावात मुले शाळेतच येत नव्हती, शिक्षकाने लॉकडाऊनमध्ये पटसंख्या 13 वरून 70 वर नेली

जम्मू (मोहित कंधारी)19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदाचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त जम्मू-काश्मीरच्या एकमेव शिक्षकाची कहाणी

संजीवकुमार शर्मा यांचा यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या ४४ शिक्षकांत समावेश आहे. विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणारे ते जम्मू-काश्मिरातील एकमेव शिक्षक आहेत. राज्यातील रियासी जिल्ह्यात इखानी-रांसू या दुर्गम डोंगराळ भागात त्यांची पोस्टिंग आहे. तेथे सामान्य दिवशीही मुले शाळेत येत नाहीत. त्यांनी कोरोनाकाळात आपल्या शाळेतील पटसंख्या १३ वरून ७० वर नेली.

स्मार्टफोन तर लांबच, येथे साधा फोनही मोजक्याच कुटुंबांकडे आहे. तरीही संजीव यांनी घरोघरी जाऊन मुलांना शिक्षणाचा लळा लावला. संधी मिळाल्यानंतर प्राथमिक शाळेतील मुलांसाठी जंगल-मैदानांतही वर्ग भरवले. यामुळेच आज त्यांच्या सरकारी विद्यालयात ४१ मुले आणि २९ मुली शिकत आहेत. २०१९ मध्ये स्वत:हून येथे पोस्टिंग घेणारे संजीव म्हणाले, येथे जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा कळाले की शाळेपर्यंत जाण्यासाठी ४ किमीची पायपीट करावी लागते.

मैदानात वर्ग, हसत-खेळत शिक्षण
संजीव म्हणाले, या भागात ऑनलाइन क्लास शक्य नाही. लॉकडाऊननंतर घरोघरी जाऊन मुलांना शिक्षणाची गोडी लावली. खुली मैदाने व जंगलांतही वर्ग भरवले. शिक्षक बनण्यापूर्वी पहिलवानकी करायचो. यामुळे खेळता-खेळता मुलांना शिकवायचो. तसेच क्रीडा क्षेत्रात करिअरसाठीही प्रेरित करायचो.

यंदाचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त जम्मू-काश्मीरच्या एकमेव शिक्षकाची कहाणी
स्मार्टफोन तर लांबच, येथे साधा फोनही मोजक्याच कुटुंबांकडे आहे. तरीही संजीव यांनी घरोघरी जाऊन मुलांना शिक्षणाचा लळा लावला. संधी मिळाल्यानंतर प्राथमिक शाळेतील मुलांसाठी जंगल-मैदानांतही वर्ग भरवले. यामुळेच आज त्यांच्या सरकारी विद्यालयात ४१ मुले आणि २९ मुली शिकत आहेत. २०१९ मध्ये स्वत:हून येथे पोस्टिंग घेणारे संजीव म्हणाले, येथे जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा कळाले की शाळेपर्यंत जाण्यासाठी ४ किमीची पायपीट करावी लागते.

मुसळधार पावसात शाळेत आल्यानंतर इमारतीवरील टिनपत्रे वाऱ्याने उडून गेल्याचे दिसले. वर्ग खोल्यांत पाणी तुंबलेले होते. त्यांनी स्वत: शाळेची स्वच्छता केली. ते पाहून स्थानिकांनीही मदत केली. संजीव म्हणाले, यामुळे तेथील लाेकांशी आपुलकीचे नाते तयार झाले. तेव्हा या शाळेत अवघे तेराच विद्यार्थी होते. पहिला दिवशी केवळ चारच मुले शाळेत आली. हे पाहून त्यांनी स्वत:च्या दोन मुलांनाही याच इखानी सरकारी शाळेत दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...