आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकार:आंध्रात 95 हजार लाभार्थींनी नाकारली सरकारची जमीन

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशात ९५ हजारांहून जास्त महिला लाभार्थी अनेक कारणांमुळे सरकारी याेजनेतून घर बांधण्यास नकार देत आहेत. या जमिनी त्यांना दाेन वर्षांपूर्वी देण्यात आल्या हाेत्या. राज्य सरकारने घरांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी महिलांची मागणी आहे.

कारण प्रस्तावित जागा मानवी वस्तीपासून दूर आहेत किंवा स्मशानभूमीजवळ तरी आहेत. आता त्यावरून सरकार पेचात सापडले आहे. कारण पर्यायी जागा शाेधण्यासाठी किमान ८०० काेटी रुपये खर्च करावे लागतील. गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, मागणीची पूर्तता करायची झाल्यास खासगी मालकांकडून २ हजार एकरपेक्षा जास्त जमिनीचे संपादन करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...