आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Andhra Pradesh Minor Girl Assault Case Updates । Attacked With Toilet Acid In Mouth

रेप करू शकला नाही म्हणून चिरला अल्पवयीन मुलीचा गळा:आंध्र प्रदेशात आरोपीने आधी अ‍ॅसिड पाजले, नंतर चाकूने वार; प्रकृती चिंताजनक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात अयशस्वी झालेल्या तरुणाने तिच्या हत्येचा प्रयत्न केला. आरोपीने आधी तिच्या तोंडात अ‍ॅसिड टाकले, नंतर गळा चिरला. ही घटना एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील एका गावातील आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री घडली, जेव्हा नववीच्या वर्गात शिकणारी 14 वर्षीय विद्यार्थिनी घरात एकटी होती. तिचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. यादरम्यान आरोपीने तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. पीडितेने स्वत:ला वाचवण्यासाठी वॉशरूममध्ये कोंडून घेतले. आरोपी तरुणाने दरवाजा तोडून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान पीडित मुलीने त्याला विरोध करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीने मुलीच्या तोंडात आणि चेहऱ्यावर टॉयलेट साफ करणारे अ‍ॅसिड टाकले. यानंतर मुलीने जोरजोरात आरडाओरड सुरू केल्यानंतर हल्लेखोराने चाकूने तिचा गळा चिरून पळ काढला. दरम्यान, मुलीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलगी पाहून तिच्या पालकांना माहिती देण्यात आली. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपी हा पीडितेचा नातेवाईक असल्याचे निष्पन्न

पोलिसांनी आरोपी नागराजूला अटक केली आहे. तो पीडितेचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला आणखी काही लोकांनी मदत केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी आहे.

कृषी मंत्री रेड्डी यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबाची भेट

राज्याचे कृषी मंत्री काकानी गोवर्धन रेड्डी यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन डॉक्टरांकडून तिच्या प्रकृतीची माहिती घेतली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याचे मंत्री म्हणाले.

अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींना कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन त्यांनी पीडित कुटुंबाला दिले. दरम्यान, नेल्लोर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक विजया राव यांनीही हॉस्पिटलला भेट दिली. पोलीस तपास करत असून लवकरच सर्व माहिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...