आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तरुणाने आपल्या पुतण्यालाही जिवंत जाळले होते, भाजल्याने त्याची परिस्थिती गंभीर आहे अनूपपूरमध्ये एका युवकाने घरातील कलहांमुळे आपला सख्खा भाऊ, वहिनी आणि एक पुतणी व पुतण्याला जिवंत जाळले. तीन जणांचा मृत्यू झाला. तर पुतण्याची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी रात्री दीड ते अडीच दरम्यान ही घटना घडली. कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या केल्यानंतर आरोपीने गळफास लावून घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँक कर्जाच्या हप्त्यावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अनूपपूरच्या धनगवां गावात ओंकार, चेतराम आणि दीपक विश्वकर्मा हे तीन भाऊ एकाच घरात राहत होते. त्यापैकी दीपक सर्वात धाकटा होता. प्रत्येकजण वेगवेगळे काम करायचे. सर्वात धाकटा भाऊ दीपकचे लग्न झाले नव्हते. वर्षभरापूर्वी दोन्ही भावांनी त्याला गॅरेज उघडण्यासाठी बॅंकेकडून 10 लाख रुपयांचे कर्ज मिळवून दिले. ओंकार आणि दीपक यांचे हप्ते वेळेवर जमा न केल्याने वाद व्हायचा.
भिंतीवर लिहिलेले - हत्येचे कारण
दिपकच्या खोलीत भिंतीवर कोळशाने काही शब्द लिहिलेले आढळले आहेत. त्यात आरोपी दिपकने लिहिले आहे की चेतरामला त्याला घरातून काढायचे होते. त्याच्यावर प्राणघातक हल्ला आणि जुगार खेळल्याचा आरोपही तो लावत होता. पोलिसांचे म्हणणे आहे की दीपकचे त्याचा भाऊ ओंकारबरोबरचे संबंध चांगले नव्हते. दोघांमध्ये पैशाबाबत वाद झाला. दीपकने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समजते. मात्र, दुसर्या अँगलनेही तपास केला जात आहे.
झोपलेल्या कुटुंबाला पेट्रोल टाकून जाळले
बुधवारी झालेल्या वादानंतर दीपकने दुपारी दीडच्या सुमारास ओंकार (40), त्यांची पत्नी कस्तुरिया (वय 35) आणि मुलगी निधी (16) यांच्या खोलीत आग लावली. त्यानंतर दीपकने आपला पुतण्या आशिष (17) यांच्या खोलीत आग लावली. आग लावताना आरोपी स्वतः जळाला.
सर्वांना मारले, नंतर आरोपीने घेतली फाशी
किंचाळणे ऐकून चेतराम आणि जवळच राहणारे त्याचे कुटुंब जागे झाले. त्यावेळी आग संपूर्ण घरात पसरली होती. त्याने सर्वप्रथम आपले कुटुंब बाहेर काढले. यानंतर पुतण्या आशिषच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि त्याला बाहेर काढले. चेतरामनेही घरात जाण्याचा प्रयत्न केला. पण, आगीमुळे तो आतमध्ये जाऊ शकला नाही. यानंतर त्याने दीपकच्या खोलीतील खिडकीतून डोकावले, तेव्हा त्याने फाशी घेतल्याचे दिसले.
कोणीही पळू शकू नये म्हणून दुचाकी जाळली
जळल्यानंतर कोणीही बाहेर पळू शकू नये म्हणून दीपकने बाहेरून दरवाजा बंद केला. तसेच घराबाहेर पार्क केलेल्या मोटारसायकललाही आग लावली. आरडाओरडा ऐकून गावातले लोक पोहोचले तेव्हा सर्व काही खाक झाले होते. यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
सकाळी घरात फक्त हाडे आणि राख आढळली
गुरुवारी सकाळी पोलिस गावात आले असता घर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीत पूर्णपणे जळून गेलेल्या तिघांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी हाडे गोळा करून तपासणीसाठी पाठवले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.