आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीर:24 तासात 8 दहशतवादी ठार, अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाने मशिदीत लपलेल्या 2 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अवंतीपोराच्या मेज पंपोरमध्ये गुरुवारी एनकाउंटरमध्ये एक दहशतवादी मारला गेला होता, तर 2 जामा मशिदीत लपले होते

जम्मू-कश्मीर के अवंतीपोरा आणि शोपियांमध्ये मागील 24 तासात सुरक्षादलाने आठ दहशतवाद्यांना ठार केले आहे. यातील पाच शोपियांमध्ये आणि तीन अवंतीपोरा एनकाउंटरदरम्यान मारले गेले. 

जम्मू-काश्मिरच्या अवंतीपोरामध्ये शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. अवंतीपोराच्या मेज पम्पोरमध्ये गुरुवारी एन्काउंटरमध्ये एक दहशतवादी मारला गेला. तर इतर दोन दहशतवादी हे मशिदीत लपले होते. शुक्रवारी सकाळी दोघांनाही कंठस्नान घालण्यात आले. 

जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी शुक्रवारी सकाळी दहशदवादी मारले असल्याची माहिती दिली. पम्पोरच्या मेज परिसरात एका इनपूटनंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. याच दरम्यान दहशतवाद्यांनी फायरिंग सुरू केली होती. सुरक्षादलाने एका दहशतवाद्याला मारले होते. मात्र इतर दहशतवादी जामा मशिदीत लपले होते. या मशिदीचा कॅम्पस खूप मोठा आहे. दहशदवाद्यांना ठार करायला सुरक्षा दलाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. तर शोपियांच्या मुनांदमध्येही गुरुवारी एका दहशतवाद्याला ठार करण्यातआले होते. मुनांदमध्ये अजुनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याला अटक 
तर दुसरीकडे दक्षिणी काश्मिरच्या अनंतनागमध्ये गुरुवारी सुरक्षादलाने एका दहशतवाद्याला अटकही केली. त्याच्याकडून हत्यार आणि स्फोटक हस्तगत करण्यात आले आहेत. न्यूज एजेंसीच्या सूत्रांनुसार, पकडण्यात आलेला दहशतवादी हा कुगामच्या रेदवानीचा इमरान डार आहे. तो नुकताच दहशतवादी संघटनेत सामिल झाला होता. 

या महिन्यात 30 अतिरेकी ठार 
18 दिवसांत आज 11 वे एन्काउंटर झाले. यापूर्वी 9 एन्काउंटरमध्ये 28 दहशतवादी ठार झाले आहेत. अलीकडेच पाकिस्तानकडून चालणार्‍या नार्को-टेरर रॅकेटलाही पकडण्यात आले. हे रॅकेट दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करण्यास मदत करत होते.

बातम्या आणखी आहेत...