आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील आयटी हब बंगळुरूसमाेर सध्या नवी आव्हाने आहेत. वर्क फ्राॅम हाेम संपल्यामुळे आयटी व्यावसायिक कामावर परतू लागले आहेत. परंतु त्यांना घरासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गेल्या वर्षभरात येथील घरभाडे दुपटीवर गेले आहे. मार्केट रिसर्चरनुसार देशात बंगळुरूतील घरमालक वर्ग आपल्या मालमत्तेचे मूल्य लक्षात घेऊन जास्तीत जास्त भाडे वसूल करत आहेत. याबाबतीत या शहराने मुंबईलाही मागे टाकले आहे.
बंगळुरूमध्ये सुमारे १५ लाख स्थलांतरित आहेत. काेविड काळात गुगल, अॅमेझाॅन, गाेल्डमॅन साक्स, अॅसेंचरसारख्या कंपन्यांतील कर्मचारी घरी परतले हाेते आणि घरातूनच ते काम करत हाेते. त्यामुळे शहरातील घरभाड्यांत प्रचंड घसरण दिसून आली हाेती. प्राॅपर्टी कन्सल्टन्सी फर्म एनाराॅकमधील रिसर्च हेड प्रशांत ठाकूर म्हणाले, सध्या तरी येथील भाड्याची घरे तेजीत आहेत. घर मालक काेराेना काळात झालेल्या नुकसानीची भरपाई आता काढली जात आहे, असे वाटते. एनाराॅकच्या डेटानुसार येथील विविध भागात २०१९ नंतर घरभाडे दुपटीने वाढले. भारतातील प्रमुख शहरांच्या तुलनेत ही आकडेवारी जास्त आहे. भाड्याव्यतिरिक्त घर मिळवण्याची देखील समस्या आहे. गेल्या वर्षी रिपुदमन भदाैरिया यांनी सिएटलमध्ये अॅमेझाॅनची नाेकरी साेडली. ते आता गूगलच्या बंगळुरू कार्यालयात नाेकरी करतात. गूगलची मुलाखत सर्वात कठीण हाेती, असे मला वाटत हाेते. परंतु घर मिळवण्यासाठी मला दुसऱ्या प्रकारची परीक्षा द्यावी लागली. या चिंतेने माझी प्रकृती व काम या दाेन्हीवर परिणाम झाला. रम्यक जैन अलीकडेच गुडगावच्या बंगळुरूत स्थलांतरित झाले. त्यांना २५ इस्टेट एजन्सीचे उंबरे झिजवावे लागल्यानंतर दाेन बेडरुमचा फ्लॅट ५० हजार रुपये भाड्याने मिळू शकला. ते म्हणाले, माझ्याकडे गुडगावमध्ये त्यापेक्षा दुप्पट माेठे घर हाेते. भाडेही ३३ टक्के कमी हाेते. त्यातही घराला गच्ची आहे. ते मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजताे.
बंद पडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समिती स्थापन
नवी दिल्ली । सरकारने देशात पूर्णपणे बंद पडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठी समितीची स्थापना केली. गृह व नगर विकास मंत्रालयाने गुरूवारी नीति आयाेगाचे माजी सीईआे अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखील ही समिती स्थापन केली. देशभरात काेणते गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत? ते पूर्ण करण्यासाठी काय उपाययाेजना करता येईल याबद्दलच्या सूचना समिती देईल. ग्राहकांना वेळेत त्यांचे घर साेपवता येईल, अशी शिफारशी करण्यास सांगण्यात आले आहे.
काेविडने राेखले बांधकाम, आता शहरावर मागणीचा ताण
रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म एंजेन स्पेससचे मालक अर्पण बत्रा म्हणाल्या, माझ्याकडे ३५ क्लाएंट आहेत. परंतु त्यांना आॅफर करण्यासाठी घर नाही. महामारीनंतर शहरातील बांधकाम क्षेत्रात वेगाने घसरण झाली. हे त्यामागील माेठे कारण आहे. अनेक नवीन प्रकल्प रखडले आहेत. एनाॅराकनुसार बंगळुरूत २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत १३,५६० वसाहती झाल्या. परंतु ही केवळ ३ टक्के वाढ आहे. मुंबईत ही वृद्धी ५५ टक्के एवढी आहे. सरकारला त्यासाठी आणखी जोर वाढवावा लागेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.