आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Begusarai, A Thief Hanging On A Bridge Stole A Mobile From A Running Train, Latest News And Update

VIDEO;अर्धा सेकंदात मोबाईल लंपास:ट्रेनच्या दरवाज्यात बसली होती 2 मुले, पुलाला लटकलेल्या तरुणाने उडवला क्षणार्धात मोबाईल

बेगुसराय23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या बेगुसरायमध्ये धावत्या रेल्वेतून अर्ध्या सेकंदात मोबाईल लंपास केल्याचा एक व्हिडिओ उजेडात आला आहे. रेल्वे डब्ब्याच्या दरवाज्यात 2 प्रवाशी बसले होते. एका मुलाच्या हातात मोबाईलफोन होता. तो त्यात काहीतरी पाहत होता. तेवढ्यात रेल्वे पुलावर लटकलेल्या एका मुलाने डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच त्याचा मोबाईल लंपास केला. हे सर्वकाही एवढ्या वेगात होते की, 2 सेकंदांपर्यंत त्या तरुणाला काहीच समजत नाही.

पाटणा व बेगुसरायला जोडणाऱ्या राजेंद्र सेतू पालावर ही घटना घडली आहे. या ठिकाणी नेहमीच अशा घटना घडतात.

पुलावरून झडप टाकून मोबाईल पळवारा भुरटा चोर.
पुलावरून झडप टाकून मोबाईल पळवारा भुरटा चोर.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, समीर कुमार नामक युवक आपल्या मित्रासमवेत कटिहारहून पाटण्याला जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या दरवाज्यात बसला होता. ही रेल्वे राजेंद्र सेतूवरून जात असताना त्यांचा मोबाईल अचानक गायब झाला. पुलाला लटकलेल्या भुरट्या चोरांनी त्यांच्या हातातील फोन झडप मारुन हातोहात गायब केला.

समीरच्या डब्ब्यात बसलेल्या दुसऱ्या एका प्रवाशाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. जवळपास 28 सेकंदांचा हा व्हिडिओ एकदा पाहिल्याने समजत नाही. पण, तुम्ही लक्ष देऊन पाहिले तर चोर किती सहजपणे रेल्वेच्या दरवाज्यात बसलेल्या प्रवाशाचा मोबाईल लंपास करतो हे लक्षात येईल.

अर्ध्या सेकंदात तरुणाचा मोबाईल लंपास.
अर्ध्या सेकंदात तरुणाचा मोबाईल लंपास.

भुरटे चोर पोलिसांनाही जुमानत नाहीत

राजेंद्र् पुलावर घडलेली ही घटना काही नवी नाही. या ठिकाणी दिवसभरात अशा अनेक घटना घडतात. जीआरपी व स्थानिक पोलिस याविरोधात सातत्याने मोहिमा राबवतात. पण, त्याचा या चोरट्यांवर कोणताही परिणाम पडत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे चोर पुलावरून थेट गंगा नदीत उडी मारून दुसऱ्या बाजूला निघून जातात.

दोरीच्या सहाय्याने पुलाला लटकतात

पोलिसांच्या माहितीनुसार, हे धूर्त चोरटे स्वतःच्या सुरक्षेचीही संपूर्ण काळजी घेतात. ते पुलाच्या खांबाला दोरीच्या सहाय्याने लटकतात. हा संपूर्ण खेळ समतोल साधण्याचा आहे. ते मोबाईल साधताना आपली धडक रेल्वेला होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात. रेल्वे या पुलावरून वेगात जात असल्यामुळे प्रवाशांना काहीच करता येत नाही. त्यामुळे या चोरटे चोरी करुन आरामात निघून जातात.

बातम्या आणखी आहेत...