आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Bihar, 5,000 Men Preserve Sperm And Left Home For Work, While Girl Saved Eggs, Latest News And Update

पती परदेशात, पत्नी झाली आई:​​​​​​​बिहारमध्ये 5 हजार पुरुष शुक्राणू देऊन नोकरीसाठी घराबाहेर पडले, मुलींनी अंडी जतन केली

मनीष मिश्रा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच सीवनच्या एका तरुणाला कुवैतचा व्हिसा मिळाला. 5 वर्षांपर्यंत तो घरी परतला नाही. पण, एक दिवस तो घरी आला तर त्याच्या पत्नीच्या मांडीवर त्याला त्याचे बाळ दिसले. तो आनंदी आहे. यात गैर असे काहीही नाही. सर्वकाही प्लॅनिंगने झाले. तरुणाला तो 5 वर्षांपर्यंत परत येणार नाही हे ठावूक होते. त्यामुळे त्याने पाटण्याच्या स्पर्म अर्थात शुक्राणु बँकेत आपले स्पर्म सुरक्षित जतन केले. 2 वर्षांनी तेथून फोन केला. त्यानंतर येथील डॉक्टरांनी त्याचे स्पर्म त्याच्या पत्नीत कंसीव्ह केले. यामुळे ती आई बनली.

जहानाबादच्या एका सैनिकाचे लग्न झाले. पोस्टिंगवर काश्मीरला जाण्यापूर्वी त्याने पाटण्यात आपले शुक्राणु जमा केले. वर्षभरापूर्वी तो स्पर्म देऊन गेला. आपण असो किंवा नसो आपला वंश पुढे चालावा अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने हे केले.

ही कहाणी बदलत्या बिहारची आहे. एक-दोन नव्हे तर राज्यातील 5 हजार जण नोकरीच्या निमित्ताने राज्य किंवा देशाबाहेर गेलेत. पण, भविष्यातील मुलांसाठी त्यांनी आपले स्पर्म जतन करवून ठेवलेत. बिहारमध्ये ही प्रकार झपाट्याने वाढत आहे. आता पुरुषांसारखे महिलाही आपली एग्ज प्रिझर्व्ह करत आहेत. त्यांची संख्या पुरुषांच्या तुलनेत 10 टक्के जास्त आहे. यात करिअरवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. चलता तर मग 8 स्लाइडमध्ये जाणून घेऊया बिहारच्या स्पर्म बँकेची रंजक कहाणी...

बातम्या आणखी आहेत...