आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारच्या बेतियात पोलिस कोठडीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. संतप्त लोकांनी या प्रकरणी पोलिस ठाणे जाळले. तसेच वाहनांचीही जाळपोळ केली. एवढेच नाही तर पोलिस कर्मचाऱ्यांना पाठलाग करुन मारहाण केली. यामुळे पोलिसांवर लगतच्या शेतात जाऊन लपण्याची वेळ आली. जवळपास ३ तास हा उपद्रव सुरू होता. पण, पोलिसांचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही.
पोलिसांनी शनिवारी दुपारी गस्तीवर असताना अनिरुद्ध यादव नामक एका तरुणाला डीजे वाजविल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला. नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर नातेवाईकांसह एका संतप्त जमावाने बलथर पोलिस ठाण्याला घेराव घालून हल्ला केला.
ठाण्यात तोडफोड केल्यानंतर जमावाने पेट्रोल टाकून ते पेटवून दिले. ठाण्यातील 3 वाहनेही ग्रामस्थांनी पेटवून दिली. बलथर चौकातील एका पोलिस जीपचीही त्यांनी मोडतोड केली. ठाण्यात हजर पोलिसांना मारहाण केली. यामुळे पोलिस जीव वाचवण्यासाठी जवळच्या शेतात जाऊन लपले. त्यानंतरही जमावाने त्यांच्या दिशेने दगडफेक केली. या घटनेमुळे या भागात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.