आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'वयाच्या 15 व्या वर्षी हायवेवर उभी राहून कस्टमर बोलावणे सुरू केले. आज 7 वर्ष झाली. कधी प्रकृती बरी नसल्यामुळे काम करण्यास नकार दिला, तर आई चिडते. वडील माझा फोटो दाखवून ग्राहक घेऊन येतात. मला घराच्या कोपऱ्यात असणाऱ्या खोलीत ढकलतात. धंदा करणे आमची परंपरा आहे. प्रथम आईने केले, आता माझा नंबर आहे.'
उदयपूरमार्गे नीमचला पोहोचताना हायवेवर या परंपरेची अनेक चिन्हे आढळतात. देशाच्या कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाहून वेगळे येथील रस्त्याशेजारी कच्ची-पक्की घरे आहेत. प्रत्येक घरापुढे बाज. आणि बाजेवर गुलदस्त्यासारखी सजलेल्या मुली. दुपारच्या कडक उन्हातही त्यांना घराच्या सावलीत आराम करण्याची मुभा नाही. हायवेवर गाडीची चाहूल लागताच ह्या मुली सावध होतात. ग्राहकांना इशारे करतात. तर काहीजणी गाडीपर्यंत धावत जातात.
हा पश्चिम मध्य प्रदेशचा बांछडा समुदाय आहे. तो वेश्यावृत्तीला परंपरा मानतो. मुली वेश्यावृत्तीतून कमावून आणल्यानंतर त्यांच्या घरची चूल पेटते. त्या लग्न करत नाहीत. पण हो, एखाद्या ग्राहकाकडून मूल राहिले, विशेषतः मुली तर त्यांना कोणतेही दुःख होत नाही. त्या आनंद साजरा करतात. शरीर भरले की तिलाही त्या हायवेवर उभे करतात. परंपरेच्या नावाने लहान वयातच मुलींच्या बाजारात आम्हाला अनेक चेहरे आढळले. प्रत्येकीची कहाणी काळ्याकुट्ट ढगांहूनही गडद आहे.
'15 किंवा त्याहून कमी वय असेल, तेव्हा पहिल्यांदा हे काम केले. आईने म्हटले की, यात काहीच लज्जास्पद गोष्ट नाही. हेच चालत आले आहे. तेव्हापासून हेच करत आहे. आई-वडिलांनी ठरवले असते तर माझे लग्न लावून दिले असते. पण, लावले नाही.' निळ्या खिडकीवर गडद निळ्या रंगाची ओढणी घेतलेली रजनी हळूवार बोलत होती. ज्या खोलीत मुलाखत सुरू होती, त्याच्या दरवाज्यावर तिची आई उभी होती. जा, असे सांगूनही ती गेली नाही. तिची रजनीचे बोलणे ऐकण्याची इच्छा होती.
अत्यंत सुंदर असलेल्या या मुलीच्या घरापुढे आमची गाडी थांबली तेव्हा तिने माझ्यासोबतच्या व्यक्तीला इशारा केला. पण, त्याच्या पाठीमागे मला पाहून आपला वर उंचावलेला हात खाली घेतला. थोड्याशा विनंतीनंतर ती मुलाखत द्यायला तयार झाली. पण, त्याचवेळी माझा व्हिडिओ व्हायरल तर करणार नाही ना अशी विचारणाही केली.
रजनी अस्खलीत हिंदी बोलते. घरातील एकुलती एक मुलगी व कमावतीही आहे. ती सांगते -'आता तुम्ही पाहिला ना, तसेच मी ग्राहकांना बोलावते. गाडीत महिला दिसली तर थांबते. सकाळपासून रात्रीपर्यंत हेच करावे लागले. कस्टमर येतात. सौदा होतो. कधी गोष्टी जुळतात. कधी नाही. काही चांगले येतात. तर काही गलिच्छ मागण्या करतात. आम्ही कोणालाही नकार देत नाही.'
ही नोकरी सोडून वेगळं का करत नाहीस? माझ्या या स्पष्ट प्रश्नाचे तेवढेच उत्तर येते -'कोणतीही तरुणी स्वतःच्या इच्छेने असे करत नाही. छोटी होते, तेव्हा पालकांनी मला या धंद्यात लोटले. आता ते वृद्ध झालेत. आईला काम होत नाही. मी शिकले नाही. आमच्याकडे शेतीबाडीही नाही. हे नाही, तर दुसरे काय करु!'
ओढणी बोटांनी मुरडत रजनी स्वतःशीच पुटपूटत होती, जसे काही तिने आईला अनेकदा नकार दिला होता. पण ती हो गोष्ट मान्य करत नाही. पप्पा रागावतात. परंपरा खंडीत करण्यासाठी माझ्यात काय वेगळे आहे, असा प्रश्न करतात. मग ते स्वतःच ग्राहकाला फोन करतात. मी झोपले किंवा आजारी असले तरी काहीच फरक पडत नाही.
सजण्याची आवड असणाऱ्या रजनीच्या हातावर टॅटू गोंदलेला आहे. पण माझी नजर त्यातील ओरखड्यांवर आहे. ती हसत म्हणते -'रागाच्या भरात एकदा हात कापून घेतला होता. पण, काहीच झाले नाही. रक्त थांबताच काम करावे लागले.'
मुलगी झाली तर तिलाही या धंद्यात लोटणार काय? वेगात डोके हलवत ती म्हणते -'नाही. केव्हाच नाही. माझ्याशी जबरदस्ती झाली. पण, माझ्या मुलीसोबत असे होऊ देणार नाही. तिला या गलिच्छ धंद्यात केव्हाच लोटणार नाही. मी जिवंत असेपर्यंत तरी नाही.'
हे ऐकताना माझ्या मनात रजनीच्या आईने असा विचार का केला नाही असा विचार येतो. आता आता ती एखाद्या गिधाडासारखी दरवाज्यात उभी आहे. मुलीची जिभ घसरली तर ती तिच्यावर तुटून पडेल असे वाटते.
तुम्ही खोलीतून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला बाजूला असलेले जाते (हाताने फिरवण्याची चक्की) दिसते. मी जवळ गेल्यावर ती हसून म्हणाली -बघा मॅडम. यात जशी डाळ दळली जाते, तसेच आम्ही मुलीही दररोज दळल्या जातो. तिचे हास्य काळजात एखाद्या बाणासारखे घुसते. आम्ही वेगाने निघून जातो.
आमचा पुढचा मुक्का जेतपुरा गाव होते. गाडी हायवेवर थांबवून आम्ही पायी थोडे आत गेलो. तिथे एका घरापुढे थांबलो. घर माती व पत्र्याचे होते. अंगणात लहान मुले खेळत होती. सोबत एक अम्मा होती. तिला तिच्या मुलीविषयी विचारले असता ती म्हणते -सुमन तलावावर गेली आहे. दोन-तीन तासांत येईल. मी परत फिरताच दरवाजा उघडला व तिची मुलगी बाहेर येते. तिच्यासोबत निघालेला व्यक्ती वेगात निघून जातो. अम्मा चाचपडत म्हणते, अरे, तू घरातच होतीस. मला दिसली नाहीस!
पिवळा सलवार-कमीज परिधान केलेली, सुमन स्वतःचे वय 21 सांगते. परंतु ती तिच्या वयापेक्षा खूप मोठी दिसते. तिचे खरे नाव खूप गोंडस आहे. कौतुक केल्यास ती आणखी खूलते व अर्थ सांगू लागते. मुलाखतीचे नाव काढल्यानंतर ती मला त्याच आतल्या खोलीत घेऊन जाते, जेथून ती काही वेळापूर्वीच बाहेर आलेली असते.
या खोलीला शेजारच्या खोलीशी जोडणारी एक खिडकी आहे. आणखी एक खिडकी घराच्या मागच्या बाजूला उघडते. ही एवढी रुंद आहे की त्यातून एखादा चांगला व्यक्तीही सहजपणे जाऊ शकतो. पोलिसांची धाड पडल्यानंतर ग्राहकांना पळून जाण्यास ही खिडकी उपयोगी पडते. या सर्व गोष्टी बांछडा समुदायाच्याच एका मुलाने आम्हाला सांगितल्या.
कस्टमरची पाठवणी करुन आलेली सुमन प्रत्येक प्रश्नाचे गोलमोल उत्तर देते. ती म्हणते -माझे पती ट्रक ड्रायव्हर आहेत. हेच काम करताना त्यांची ओळख झाली. हाय वेवरून जाताना ते येथे थांबू लागले. त्यानंतर एकेदिवशी मला मागणी घातली. मी हो म्हटले. आता आमची 5 मुले आहेत. माझी आईही माझ्यासोबत राहते. पती आमचा खर्च उचलतो. राशन-पाणी आणून देतो. मी आता त्या धंद्यातून बाहेर पडले आहे.
बिल्कूल सोडले? माझा प्रतीप्रश्न.
ती म्हणते - ते ट्रक घेऊन गेल्यानंतर 10-12 दिवसांनी परत येतात. कधी काही गरज भासली, तर 'चूक' होते. पण, येथे सर्वजण 'फॅमिली टाइप' लोक आहेत.
मध्येच दुसरा एक कस्टमर येतो. घर्र-घर्र करणाऱ्या पंख्याखाली घामाने न्हाऊन निघालेली मी सुमनला सोडून बाहेर तिच्या आईजवळ जाऊन थांबते. एवढ्या वेळात तिला मी पत्रकार असल्याचे समजते. बाछडांच्या परंपरेचा उल्लेख केल्यानंतर ती थेट सांगते -मला कोणतीही मुलगी नाही (तिला माझे तिच्या मुलीशी बोलणे झाल्याचे माहिती नसते). मुलगी असती तर आम्ही अशा मातीच्या घरात राहिलो असतो काय. तेव्हा आमचेही पक्के घर असते. आमच्याकडे एसी-कुलर असता.
तसेही आमचे घर रस्त्यापासून एवढे दूर आहे. हायवे ओलांडून एवढ्या दूर कोण येईल, असेही ती पुढे जोडते. मी माझ्या होमवर्कच्या थैलीतून प्रश्न बाहेर काढते. तुमच्या समुदायातील मुलींचे लग्न होत नाहीत, असे मी ऐकले आहे. असे का?
लग्न कसे होईल! मुलाकडचे 10 ते 12 लाख रुपये मागतात. एवढे पैसे कुठून येतील. आमच्याकडे घरदार काहीच नाही. पैसे नाहीत म्हणून अनेक मुले लग्नाविना म्हातारे होत आहेत.
पैसे का द्यावे लागतात?
जर तुम्ही लाडी (मुलगी) आणली तर तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील - अम्मा तर्क देते.
लाडी (मुती जे काही बोलू शकली नाही, याचे उत्तर मला या समाजातील आकाश चौहान या तरुणाकडून मिळते. ते सांगतात की, बांछडा समाजात फक्त मुलगीच कमावते. तिने एकदा आपल्या आई-वडिलांना लग्न करुन 10-15 लाख रुपये दिले की, मग तिच्यावर त्यांचा काहीच अधिकार उरत नाही. हो, पण तिचा पती तिला पुन्हा त्या हाय वेवर उभ करू शकतो.
गेल्या अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी मोहीम छेडणारा आकाश आपल्याच समाजाचे थर एखाद्या निर्दयी व्यक्तीप्रमाणे उघड करतो. तो म्हणतो - मी माझ्यासमोर सर्व काही घडताना पाहिले. कोणी एड्सने मरतो. काही वृद्धावस्थेत गरिबीने मरतील. पण ते आपल्याच लहान मुलींचा सौदा करणे सोडणार नाहीत.
नीमच-मंदसौरपासून रतलामपर्यंत हायवेलगत आमची 68 गावे आहेत. तेथील 2 हजारांहून अधिक अल्पवयीन मुली सेक्स वर्क करतात. हा डेटा कुठून मिळाला, असा प्रश्न केला असता आकाश सांगतो -मी स्वतः याचिका दाखल करुन सर्व गोळा केला. वकील लावताना अडचणी येतात. त्यामुळे स्वतःच वकिलीचे शिक्षण घेतले.
वडील बाहेर बसलेले असतात. तर मुली आत ग्राहकांसोबत वेळ घालवतात. रात्री 12 वा. एखाद्या गाडीने हॉर्न वाजवला, तर आई-वडील मुलीला उठवतात. एकाच घरात, एकाच छताखाली हे सर्व होते. अनेकदा कुटुंबातील लोक नकार देत आपल्या मुलीवर बलात्कार करवून घेतात. हे सर्वकाही तिला सवय लावण्यासाठी केले जाते.
आकाश सांगतो - चांगली गोष्ट म्हणजे मला बहिण नाही. अन्यथा मलाही ऐतखाऊपणाचा रोग झाला असता. मग, मीही काहीशे रुपयांसाठी तिच्यासाठी ग्राहक घेऊन आलो असतो व खोलीबाहेर बसून काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा केली असती.
(नोट -या बातमीसाठी आम्ही नीमच्या नेवड, जेतपूरा व चलदू गावासह मंदसौरच्या मुरली गावाला भेट दिली. सार्वजनिक कारणांमुळे मुलीचा चेहरा व नाव गोपणीय ठेवण्यात आले आहे.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.